शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

पुणे महापालिकेच्या तिजोरीत वर्षाअखेर तेराशे कोटींचा कर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2020 22:30 IST

वसुलीसाठी तीन हजारांहून बिगरनिवासी मिळकतींसमोर वाजविला बॅण्ड

ठळक मुद्देगेल्या आर्थिक वर्षात पालिकेला मालमत्ता करातून १ हजार १९५ कोटी रूपये मिळाले

पुणे : पुणे महापालिकेच्या कर संकलन विभागाने ३१ डिसेंबर,२०१९ अखेर १ हजार २९९ कोटी २८ लाख रूपये पालिका तिजोरीत जमा केले आहेत. थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी कर संकलन विभागाकडून राबविणाºया अभियानात, बॅण्ड वाजवून संबंधिताचा थकीत कराचा डंका पिटला जात आहे. परिणामी मिळकत धारकाकडून थकित मालमत्ता कराची वसुली करण्यास पालिकेला यश आले आहे.           पुणे महापालिकेचे कर संकलन प्रमुख विलास कानडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर,२०१९ पासून थकित मालमत्ता कर वसुलीसाठी बहुतांशी कर थकित बिगर निवासी मिळकतींसमोर बॅण्ड वाजवून, संबंधितांना थकीत कराची जाणीव करून दिली जात आहे. वारंवार नोटिस पाठवून कर जमा न झाल्याने बॅण्ड वाजून संबंधिताला जागे करण्यात येत आहे. आपल्या थकीत कराचा आणखी गाजा-वाजा नको म्हणून मिळकतधारक थकीत कर पालिकेकडे जमा करीत आहे. पालिकेने गेल्या दोन महिन्यात शहरातील तीन हजाराहून अधिक बिगर निवासी मिळकतींसमोर थकीत कर वसुलीसाठी हा अभिनव प्रयोग राबविला आहे. पालिकेच्या वार्षिक करवसुलीचा हिशोब आर्थिक वर्षानुसार ठेवला जातो. गेल्या आर्थिक वर्षात पालिकेला मालमत्ता करातून १ हजार १९५ कोटी रूपये मिळाले होते. याची तुलना करता यावर्षी ३१ डिसेंबर,२०१९ अखेर म्हणजेच नऊ महिन्यात पालिकेच्या तिजोरीत १ हजार १०० कोटींचा मालमत्ता कर जमा झाला आहे़. गेल्यावर्षीपेक्षा तो १२५ कोटी रूपयांनी जास्त आहे़. कर संकलन विभागाने शहरातील ७ लाख ५१ हजार ३५६ मिळकतींकडून १ जानेवारी,२०१९ ते ३१ डिसेंबर,२०१९ या कॅलेंडर वर्षात १ हजार २९९ कोटी २८ लाख ४१ हजार ९३० कोटी रूपये जमा केले आहे. ऑनलाईन पेमेंट धरून हा आकडा तेराशे कोटींवर गेला आहे़. या करप्राप्तीमध्ये शहरातील ६ लाख ५१ हजार ३५६ निवासी मालमत्तांकडून ६३६ कोटी ८६ लाख,९७ हजार रूपये, १ लाख ३ हजार ६ बिगर निवासी मालमत्तांकडून ५१० कोटी ६९ लाख ९४ हजार ४३ रूपये, ११ हजार ३६३ ओपन प्लॉटव्दारे ६१ कोटी ८८ लाख ७९ हजार ८८६ रूपये तर इतर १४ हजार ४३५ मिळकतींद्वारे ८९ कोटी ८२ लाख ७० हजार ६४५ रूपये मालमत्ता कर जमा झाला आहे. .........थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी ३१ डिसेंबर,२०१९ अखेर न्यायालयामार्फ त शहरातील १८७ मिळकतधारकांना नोटिस बजाविण्यात आल्या असून, याद्वारे जमा झालेल्या धनादेशाव्दारे १ कोटी २ लाख रूपये पालिकेला मिळाले आहेत. तर ज्या मिळकत धारकांचे धनादेश वटले नाहीत अशा २२ मिळकत धारकांवर न्यायालयात खटले दाखल करण्यात आले आहेत.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाIncome Taxइन्कम टॅक्स