‘तंटामुक्ती’ समितीच्या निवडीतच ‘तंटा’
By Admin | Updated: September 13, 2015 01:04 IST2015-09-13T01:04:28+5:302015-09-13T01:04:28+5:30
न्हावी (ता. इंदापूर) येथील तंटामुक्ती अध्यक्ष व समिती निवडीच्या वेळी बेकायदा जमाव जमवून ग्रामसेवकाला धक्काबुक्की, मारहाण करण्यात आली. या वेळी झालेल्या दगडफेकीमध्ये

‘तंटामुक्ती’ समितीच्या निवडीतच ‘तंटा’
कुरवली : न्हावी (ता. इंदापूर) येथील तंटामुक्ती अध्यक्ष व समिती निवडीच्या वेळी बेकायदा जमाव जमवून ग्रामसेवकाला धक्काबुक्की, मारहाण करण्यात आली. या वेळी झालेल्या दगडफेकीमध्ये पोलीस कर्मचाऱ्यास दुखापत झाली आहे. या घटनेत पोलिसांनी १७ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
न्हावी (ता. इंदापूर) येथील तंटामुक्ती अध्यक्ष व समितीची निवड पार पाडत असताना, बेकायदा जमाव जमवून आरोपींनी ग्रामसेवक पांडुरंग आबा आटोळे यांच्या हातातील कागद फाडले. त्यांना धक्काबुक्की, मारहाण केली. या वेळी झालेल्या दगडफेकीत बंदोबस्तासाठी आलेले पोलीस नाईक सुभाष काळे यांना दुखापत झाली आहे. तसेच, सरकारीकामात अडथळा आणल्याबाबत, ग्रामसेवक आटोळे यांनी वालचंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याप्रकरणी वालचंदनगर पोलिसांनी न्हावी (ता. इंदापूर) गावातील दीपक डोंबाळे, पप्पू डोंबाळे, शरद डोंबाळे, गोरख देवकाते, गणेश डोंबाळे, हनुमंत मारकड, सोमनाथ बोराटे, कांतिलाल बोराटे, गुणवंत देवकाते, बापू देवकाते, साहेबराव देवकाते, योगेश अंकुश बोराटे, हनुमंत डोंबाळे, श्रीमंत भगवान डोंबाळे, लक्ष्मण तुळशीराम बोराटे, आबासाहेब मारकड, अनिल चोपडे (सर्व रा. न्हावी) या १७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस यू. ए. वाघमोडे करीत आहेत.
आरोपींचा शोध सुरूच
वालचंदनगर पोलीस ठाण्याने दिलेल्या माहितीनुसार, अद्याप या प्रकरणातील आरोपींना अटक झालेली नाही. सर्व आरोपी फरार आहेत. तसेच, त्यांचा शोध सुरू आहे.