वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार: अनिता यांचे शुक्रवारी (२९ जानेवारी) शेजाऱ्यांशी किरकोळ वाद झाल्याने, त्या तक्रार देण्यासाठी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आई, चुलती, दोन बहिणी भाचा यांच्यासमवेत दोन रिक्षांतून आले होते. पोलीस ठाण्यातील काम झाल्यानंतर, थेऊर येथे घरी परत जाण्याकरिता रिक्षाने (एमएच १२ ईक्यू ०४५३) निघाल्या होत्या. रिक्षामध्ये अनिता व रिक्षा ड्रायव्हर आणखी एक प्रवासी अस्लम असे तिघेेे जण होते. साडेबाराच्या सुमारास थेऊर गावच्या हद्दीतील वाँशिग सेंटर समोर आले. त्या वेळी समोरून भरधाव वेगाने आलेल्या टँकरने (एमएच १२ एचडी २१२०) रिक्षास धडक दिली. यामुळे रिक्षा रस्त्यावरच उलटली. अस्लम व रिक्षाचालक यांना मार लागल्याने ते बेशुद्ध अवस्थेत पडले, तर आनिता लोंढे जागीच ठार झाल्या. त्यानंतर मंदार सकट यांनी तेथे जमलेल्या लोकाच्या मदतीने दोन्ही जखमींना ससून रुग्णालयात पाठवून दिले.
--