टँकरला कार धडकून तिघे जागीच ठार
By Admin | Updated: January 15, 2016 02:12 IST2016-01-15T02:12:47+5:302016-01-15T02:12:47+5:30
पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावर वेळू (ता. भोर) गावाजवळ उभ्या असलेल्या टँकरला कारने जोरदार धडक दिली. या अपघातात ३ जण जागीच ठार, तर २ जण गंभीर जखमी झाले आहे.

टँकरला कार धडकून तिघे जागीच ठार
भोर : पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावर वेळू (ता. भोर) गावाजवळ उभ्या असलेल्या टँकरला कारने जोरदार धडक दिली. या अपघातात ३ जण जागीच ठार, तर २ जण गंभीर जखमी झाले आहे. ही घटना गुरुवारी सकाळी ६.३० वाजता घडली. अपघातातील सर्व जण मुंबईचे असून, ते महाबळेश्वरला फिरायला निघाले होते.
एका हॉटेलचे कर्मचारी असलेले हे ५ जण कारने बुधवारी लोणावळ्याला आले. रात्री तेथे मुक्काम करून पहाटे पुणे-सातारा महामार्गावरून महाबळेश्वरला चालले होते.
सकाळी ६.३० वाजता वेळू गावाजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टँकरला पाठीमागून कारने जोरदार धडक दिली.
आयुष आशितोष कनुंगे (२३, रा. अंधेरी, मुंबई), अध्यांक किसन काटोर (२४, रा. चर्चगेट, मुंबई), चिनार रमेश राऊत (२२, रा. नालासोपारा) अशी मृतांची नावे असून, अनिकेत नामदेव थवार (२५, रा. विरार) आणि अभिषेक पुरुषोत्तम चौधरी (२४, रा. कल्याण) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)