शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची माघार! अंतर्गत तणावानंतर तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली लढण्यास सहमती; गहलोत-लालू भेटीने जुळले समीकरण
2
“२०२९ पर्यंत मीच महाराष्ट्राचा CM, हेच कार्यक्षेत्र, दिल्ली अजून दूर”: देवेंद्र फडणवीस
3
Gold Silver Price Review: आणखी स्वस्त होणार का सोनं? आता खरेदी करण्याची संधी की अजून थोडी वाट पाहावी...
4
केरळच्या गुरुवायुर मंदिरातून लाखोंचे सोने-चांदी गायब; २५ कोटींच्या वस्तूंची नोंदच नाही!
5
IND vs AUS 2nd ODI : हिटमॅन रोहितनं रचला इतिहास; ऑस्ट्रेलियात असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
6
केवळ ₹२७ लाखांना पडेल ₹५० लाखांचं घर; Home Loan घेताना फक्त ही छोटी ट्रिक वापरा आणि जादू पाहा
7
"मला या जगावर ओझं व्हायचं नाहीये, माझं निधन झाल्यास..."; बॉलिवूड अभिनेत्याचं मोठं विधान, चाहते भावुक
8
मुंबईत महायुती, इतरत्र स्वतंत्र; मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट संकेत, विरोधकांवर जोरदार हल्लाबोल
9
IND vs AUS : फक्त मैदान बदलले! टॉसवेळी टीम इंडियाच्या बाबतीत पुन्हा तेच घडलं
10
भाऊबीजला माहेरी जाण्यावरून वाद; पतीने नकार देताच पत्नी संतापली, रागाने आधी चिमुकल्याला संपवलं अन्..
11
आजचे राशीभविष्य : गुरुवार 23 ऑक्टोबर २०२५; आत्मविश्वास वाढेल, जीवनसाथी किंवा प्रिय व्यक्तीचा सहवास आनंददायी असेल
12
निवडणूक आयोगाकडून आता देशभर SIRची तयारी; दिल्लीत दोन दिवसीय परिषद, अधिकाऱ्यांकडून आढावा
13
तेलावरून तापले राजकारण; ट्रम्प पुन्हा म्हणाले, भारत रशियन तेलाची खरेदी कमी करणार
14
मुंबईत महायुती एकत्र, काँग्रेसला सेना- मनसे नकोच; आयोगाच्या आदेशाआधीच नगरपालिकांसाठी तयारी
15
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर प्रतिबंध लादण्याचा प्रयत्न निंदनीय”: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
16
सरकारने केली शेतकरी, बेरोजगारांची फसवणूक: चेन्नीथला, काँग्रेसची राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा
17
रेल्वे अपघातात पती गमावला, तिने लढा दिला; २३ वर्षांनंतर ‘सुप्रीम’ निर्णयाने न्याय मिळाला
18
सुवर्णाची झळाळी, शिर्डी साईमंदिरात उत्साहात दिवाळी; २.५० कोटींच्या रत्नजडित दागिन्यांची आरास
19
चांदीत ८ दिवसांत २६ हजारांची घसरण; सोन्याच्या दरालाही मोठा फटका, १ दिवसात ११ हजारांनी उतरले
20
सत्या नाडेला यांना वार्षिक पगार ₹८४६ कोटी मिळणार; एआयमुळे दिली मायक्रोसॉफ्टला ओळख

तात्पुरता दिलासा की क्लीन चिट? ससूनच्या चार पानी अहवालात दीनानाथ रुग्णालय, डॉ. घैसास यांच्यावर ठपका नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 19:23 IST

- पुणे पोलिसांकडून पुन्हा स्पष्टीकरणाची मागणी

-किरण शिंदेपुणे : ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय समितीने दिलेल्या अहवालात दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि डॉ. घैसास यांच्यावर कोणताही ठपका ठेवलेला नाही. त्यामुळे या प्रकरणात रुग्णालयाला तात्पुरता दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे. ६ पानांचा हा अहवाल पुणेपोलिसांना सादर करण्यात आला आहे.अधिकच्या माहितीनुसार, या अहवालात दीनानाथ रुग्णालयातील उपचार प्रक्रियेबाबत समितीकडून स्पष्ट भूमिका घेतली गेली असून, कोणत्याही प्रकारचे वैद्यकीय दुर्लक्ष झाले नसल्याचे संकेत मिळाले आहेत. मात्र, पुणे पोलिसांनी या अहवालातील चार महत्त्वाच्या मुद्द्यांवर ससून रुग्णालयाकडून पुन्हा अभिप्राय मागवला आहे.तत्पूर्वी, या प्रकरणात सुरुवातीपासूनच तनिषा भिसे यांचे कुटुंबीय रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप करत होते. विशेषतः तनिषाच्या नणंदेने प्रसारमाध्यमांसमोर उपचारप्रक्रियेतील त्रुटी व संपूर्ण घटनाक्रम मांडला होता. पोलिस प्रशासनालाही याची माहिती देण्यात आली होती.तर या घटनेनंतर भिसे कुटुंबीयांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या संपूर्ण प्रकाराची माहिती दिली. भविष्यात अशी दुर्लक्षाची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी योग्य ती खबरदारी घेण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. "आमचा रोष केवळ एका व्यक्तीवर नाही, तर संपूर्ण ढिसाळ व्यवस्थेवर आहे," असे स्पष्ट मत कुटुंबीयांनी मांडले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास व निर्णय ससून रुग्णालयाच्या अंतिम अभिप्रायानंतर घेतला जाणार आहे.

टॅग्स :Puneपुणेhospitalहॉस्पिटलPregnancyप्रेग्नंसीpregnant womanगर्भवती महिलाpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिस