शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

तळेगावचा ऊस निघाला दुबईला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2018 06:59 IST

आत्तापर्यंत तीन शेतकऱ्यांचा २०० टन ऊस दुबईला रवाना

तळेगाव ढमढेरे : शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे विठ्ठलवाडी परिसरातील शेतकऱ्यांचा ऊस आता दुबईला रवाना होऊ लागला आहे.सध्याच्या मंदीच्या काळातही शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे, विठ्ठलवाडी परिसरातील प्रगतिशील शेतकरी सोपान गणपतराव गवारी, जालिंदर भाऊसाहेब ढमढेरे व विजय काळूराम शिंदे या तीन शेतकºयांचा २०० टन ऊस आत्तापर्यंत दुबईला रवाना केलेला आहे. सध्या मंदीचे वातावरण असल्याने शेतकऱ्यांच्या उसाला टनाला २ हजार ५५० रुपये भाव दिला जात असून, परिसरात इतर व्यापाºयांच्या तुलनेत हा बाजारभाव चांगला मिळत असल्याने शेतकरीवर्ग आनंदी आहे. शिरूर तालुक्यातील शेतकºयांच्या शेतातील ऊस रसवंतीसाठी प्रथमच थेट दुबईला जात आहे. शेतकºयांच्या उसाची गुणवत्ता पाहूनच उसाची निवड करून हा ऊस दुबईला पाठविण्यात येतो.थेट शेतकºयांच्या शेतातून ट्रकने मुंबई येथील न्हावाशिवा बंदरापर्यंत व पुढे बोटीच्या साह्याने समुद्रातून दुबई येथील व्यापारी आयूब खान यांच्याकडे रवाना केला जातो. हा ऊस पुढे रसवंतिगृहासाठी पाठविण्यात येतो, असे संपत गवारी यांनी सांगितले. सध्या मंदीचे वातावरण व पाऊस आणि थंडी यांमुळेही उसाला मागणी कमी आहे.आजपर्यंत मुंबई, दिल्ली, हरियाणा, ग्वाल्हेर, हैदराबाद, जम्मू आदी भागांमध्ये या परिसरातील शेतकºयांच्या शेतातील ऊस हा उसाच्या गुणवत्तेनुसार पाठविला गेलेला आहे. परंतु, आता शिरूर तालुक्यातील दर्जेदार ऊस प्रथमच दुबई येथे रवाना होत आहे. -संपत गवारी, ऊस व्यापारी- विठ्ठलवाडीसाधारण २५ हजार रुपये एवढ्या कमीत कमी खर्चामध्ये अवघ्या दहा महिन्यांत बारा फुटी लांब कांड्यांचे उसाचे उत्पादन एकरी ६० टन घेऊन दुबईला पाठविल्याने मंदीच्या काळातही १ लाख ५३ हजार रुपये मिळाले आहेत. -जालिंदर भाऊसाहेब ढमढेरे,प्रगतिशील शेतकरी, तळेगाव ढमढेरे

टॅग्स :DubaiदुबईPuneपुणेFarmerशेतकरी