टाकळीकर दिंडीने दिली आध्यात्मिक विचारांची जोड : गावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:07 IST2021-07-03T04:07:52+5:302021-07-03T04:07:52+5:30

टाकळी हाजी (ता. शिरूर) येथे टाकळीकर दिंडी मंडळाच्या दिंडीचे वीणापूजन माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या हस्ते झाले. या वेळी ...

Taklikar Dindi's Addition of Spiritual Thoughts: Gawde | टाकळीकर दिंडीने दिली आध्यात्मिक विचारांची जोड : गावडे

टाकळीकर दिंडीने दिली आध्यात्मिक विचारांची जोड : गावडे

टाकळी हाजी (ता. शिरूर) येथे टाकळीकर दिंडी मंडळाच्या दिंडीचे वीणापूजन माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या हस्ते झाले. या वेळी माजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे, दिंडी मंडळाचे मार्गदर्शक सुभाष गावडे, अध्यक्ष शिवाजी कांदळकर, नवनिर्वाचित अध्यक्ष अशोक शिंदे, अध्यक्ष बन्सी घोडे, माजी अध्यक्ष सखाराम खामकर, प्रकाश भाकरे, पोपट उचाळे, सुभाष भोसले, उपाध्यक्ष नारायण कांदळकर, कारभारी शितोळे, अंकुश उचाळे, रोहीदास घोडे, शांताराम उचाळे, भाऊसाहेब कांदळकर, पोपट घोडे उपस्थितीत होते.

गावडे म्हणाले की, प्रत्येक गावात धार्मिक कार्यक्रमातून जुनी संस्कृती व विचार जोपासले जातात. राज्याला साधू- संतांचा वारसा असून तो नव्या पिढीने टिकवला पाहिजे. या वेळी देहू येथे वीणा घेऊन सुभाष महाराज गावडे यांनी प्रस्थान केले. त्यांचा सत्कार करण्यात आला.

फोटो : टाकळीकर दिंडी मंडळाच्या वीणापूजन शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या हस्ते झाले त्यावेळेस उपस्थित वारकरी.

Web Title: Taklikar Dindi's Addition of Spiritual Thoughts: Gawde