पुणे : सक्तवसुली संचालनालय (ईडी) आणि राज्य शासनाने जप्त केलेल्या डीएसके यांच्या संपत्तीचा लिलाव करण्यासाठी जाहीर नोटीस काढावी, असा आदेश सोमवारी विशेष न्यायाधीश जयंत राजे यांनी दिला आहे.ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी डीएसके आणि त्यांचे नातेवाईक यांच्या 463 स्थावर व जंगम मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. ठेवीदारांचे पैसे परत मिळावे म्हणून त्यांची विक्री करावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार न्यायालयाने या संपत्तीची विक्री करण्याबाबत नोटीस काढावी, असे आदेश दिले आहेत.नोटीस काढल्यानंतर संबंधित संपत्तीबाबत कुणाची हरकत असल्यास त्यांनी 3 फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर राहून आपल्या हरकती नोंदवाव्यात. त्या हरकतींचा निपटारा झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे, असे न्यायालयाने सांगितले.
डीएसके यांच्या संपत्तीचा लिलाव करण्याबाबत जाहीर नोटीस काढावी : न्यायालयाचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2020 20:07 IST
ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी डीएसके आणि त्यांचे नातेवाईक यांच्या स्थावर व जंगम मालमत्ता जप्त
डीएसके यांच्या संपत्तीचा लिलाव करण्याबाबत जाहीर नोटीस काढावी : न्यायालयाचे आदेश
ठळक मुद्देसंबंधित संपत्तीबाबत कुणाची हरकत असल्यास त्यांनी 3 फेब्रुवारी रोजी राहावे न्यायालयात हजर