शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-उद्धवसेना युती ही आषाढीच्या घरी महाशिवरात्र; भाजपाने आकडेवारी देत ठाकरे बंधूंना डिवचले
2
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या समर्थकाला 'बांगलादेशी' सोडून घेऊन गेले, आसाम पोलिसांवर हल्ला; १० जणांना अटक
3
मनसे सोडल्यावर प्रकाश महाजन पहिल्यांदाच राज ठाकरेंवर थेट बोलले; म्हणाले, “विठ्ठलानेच...”
4
९०% लोकांना माहीतच नाही iPhoneची 'ही' जादू! स्क्रीनला हात न लावता सेकंदात करता येते काम
5
पोर्टफोलिओमध्ये करा 'हे' ५ बदल! संरक्षण आणि आयटी शेअर्समध्ये मोठी संधी; पाहा नवीन टार्गेट प्राईस
6
बांगलादेशच्या उच्चायुक्तांनी दिल्ली सोडली! युनूस सरकारकडून तातडीने ढाका गाठण्याचे आदेश; नेमके कारण काय?
7
'ती' गेल्याचं ऐकलं अन प्रियकरानेही प्राण सोडले! हॉस्पिटलमधून पळाला अन् काही तासांतच…
8
२०२६ मध्ये चांदीची चमक होणार का कमी? एका झटक्यात ₹२४,४७४ ची घसरण, काय आहेत हे संकेत?
9
मोठी बातमी! ९१ ड्रोन... युक्रेनचा पुतीन यांना मारण्याचा प्रयत्न; निवासस्थानाजवळ घातकी ड्रोन पाडले अन्...
10
ब्रह्मपुत्रेच्या काठी हिंदूंच्या रक्ताचा पूर! २०० हून अधिक हल्ले, बांगलादेशातील 'या' जिल्ह्यात हिंदूंचे अस्तित्व धोक्यात
11
इराणवर सर्वात मोठा हल्ला होईल, तो थांबवता येणार नाही; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
12
भारतातील १० सर्वात मोठ्या कंपन्यांच्या बाजार भांडवलात मोठा चढ-उतार, SBI च्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक नुकसान
13
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; मुलगा १७ वर्षांनी परतताच...
14
हिंगोलीकरांची पहाट भीतीदायक! पिंपळदरी, नांदापूर परिसरात धरणी माता हादरली; पहाटे ५:५६ची ती वेळ...
15
नात्याला काळिमा! नराधम पित्याचा १३ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; पोलीस आईनेच पतीला धाडले गजाआड
16
कर्ज, किडनी आणि गांजा : शेतकरी या मार्गाने का निघाले?
17
नाशिकच्या श्री काळाराम मंदिराच्या विश्वस्तपदासाठी राजकारण्यांचे वावडे
18
विनाशकारी विकासाला नकार! अरवलीचे संरक्षण म्हणजे विकासाला विरोध नव्हे...
19
"...तर इस्रायल संपला असता!" ट्रम्प यांनी केलं नेतन्याहूंचं कौतुक, ५ मिनिटांत ३ मोठे प्रश्न लावले मार्गी!
20
राज्यातील वाढते रस्ते अपघात रोखा; नितीन गडकरींचे CM ना पत्र, तातडीने उपाययोजना करायची सूचना
Daily Top 2Weekly Top 5

फसवणा-यांचा सूड घ्या, नगरसेवकांच्या कार्यक्रमात संजय राऊत यांची मोदींवर टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2018 05:53 IST

देशातच नाही तर परदेशात जाऊनही मोदी थापाच मारतात. सव्वाशे कोटी लोकसंख्येच्या देशात आम्ही ६०० कोटी मते घेऊन निवडून आलो आहोत, असे त्यांनी परवाच दावोस येथे सांगितले.

पुणे : छत्रपती शिवाजीमहाराजांचे नाव घेत सत्तेवर आले. मात्र त्यानंतर जनतेची फसवणूकच केली. अशा फसव्या लोकप्रतिनिधींचा पराभव करून त्यांचा सूड घ्या, असे आवाहन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले. स्वबळावर सत्तेवर येण्याचे बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न येत्या विधानसभा निवडणुकीत आम्ही पूर्ण करणारच, असा निर्धार त्यांनी शिवसैनिकांची साथ घेत व्यक्त केला.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पालिकेच्या प्रभाग क्रमांक २६ मध्ये (महंमदवाडी कौसरबाग) नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे व नगरसेविका प्राची आल्हाट यांच्या प्रभागातील विविध विकासकामांचे उद््घाटन राऊत यांच्या हस्ते झाले. खासदार शिवाजीराव आढळराव, शहरप्रमुख महादेव बाबर, शिवसेनेचे गटनेते संजय भोसले, नगरसेविका संगीता ठोसर, हडपसर विधानसभा मतदारसंघाचे सहसंपर्क प्रमुख विजय देशमुख, तानाजी लोणकर उपस्थित होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी थापा मारतात. त्यांच्या नावावर निवडून आलेले आमदार, खासदार हेही थापाच मारतात. सगळ्यांनी मिळून जनतेला फसवण्याचा उद्योग सुरू केला आहे. देशातच नाही तर परदेशात जाऊनही मोदी थापाच मारतात. सव्वाशे कोटी लोकसंख्येच्या देशात आम्ही ६०० कोटी मते घेऊन निवडून आलो आहोत, असे त्यांनी परवाच दावोस येथे सांगितले, अशी टीका राऊत यांनी केली.खासदार शिवाजीराव आढळराव म्हणाले, सध्याचे सरकार केवळ योजनांची घोषणा करित आहे. मात्र प्रत्यक्षात कोणतेही काम करत नाही. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.शेतकरी नाराज आहे, व्यापारी भाजपाच्या जवळ जात नाही. त्यामुळे शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या लाटेते भाजपाचे खासदार, आमदार कुठेच दिसणार नाही.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा