शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

काैमार्याच्या चाचणी विराेधात दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी तात्काळ बैठक घ्या : निलम गाेऱ्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2019 19:30 IST

काैमार्याच्या चाचणी विराेधात दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी तात्काळ बैठक बाेलवावी अशी मागणी आमदार निलम गाेऱ्हे यांनी गृहराज्य मंत्री रणजित पाटील यांच्याकडे केली आहे.

पुणे : महाराष्ट्रात सामाजिक बहिष्कारपासून व्यक्तींचे संरक्षण कायदा अस्तित्वात असताना देखील पुण्यात गेल्या काही दिवसांमध्ये कांजरभाट समाजातील दाेन मुलींची काैमर्याची चाचणी घेण्यात आली. तरुणाई या चाचणीच्या विराेधात आवाज उठवत असताना सरकारने  2018 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिलेल्या आश्वासनांची अजूनही पूर्तता केली नाही. त्यामुळे या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी तातडीची बैठक बाेलवावी अशी मागणी आमदार निलम गाेऱ्हे यांनी गृहराज्य मंत्री रणजित पाटील यांच्याकडे केली आहे. 

पुण्यात 2 आणि 27 जानेवारी राेजी कंजारभाट समाजातील दाेन मुलींची काैमार्य चाचणी घेण्यात आल्याचा प्रकार समाेर आला आहे. तरुण या कुप्रथांविराेधात आवाज उठवत असताना काहीना जातपंचायचीच्या जाचाला अजूनही शरण यावं लागत आहे. अघोरीप्रथा अनुसरतांना या कंजारभाट समाजाच्या प्रथांविषयी प्रबोधन, समुपदेशन करणा-या त्याच समाजातील सुशिक्षित तरुणांना जातपंचायतीच्या सदस्यांनी मारहाण होत असल्याबाबत निलम गाेऱ्हे यांनी 28 फेब्रुवारी 2018 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी उपस्थित केली हाेती. 

यावर उत्तर देताना, आयपीसी व सीआरपीसी नुसारच्या जातपंचायतीच्या पंचांनी हस्तक्षेप करणे कायदयांचे उल्लंघन ठरेल असे माहितीपर परिपत्रक जरी करण्यात येईल. तसेच कौमार्य चाचणी जाहीर करणे हे प्रतिबंध करायला वा त्यासाठी नियमावली करणे कायद्याने अयोग्य आहे. याची जाणीव जातपंचायतीला व त्यात्या जातींच्या सदस्यांना माहिती देण्यास प्रबोधन करण्यास येईल. तसेच या प्रकारे लग्नानंतर चाचणी घेऊ नये याबाबत स्टिंग वा प्रतिबंधात्मक कारवाईच्या सूचना देण्यात येईल. या विषयांचा आढावा शासन स्तरावर दर महिन्याला घेऊन जातपंचायत विषयक कायद्याची कार्यवाही योग्य त्या प्रकारे होते की नाही यावर सरकार देखरेख करणार आहे. सर्वांना बोलवून सरकारच्या वतीने बैठक लवकरच घेईल असे आश्वासन रणजित पाटील यांच्याकडून देण्यात आले हाेते. त्यामुळे या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी तातडीची बैठक घेण्यात यावी या मागणीचे पत्र गाेऱ्हे यांनी पाटील यांना पाठवले आहे. गाेऱ्हे म्हणाल्या, विधीमंडळात कायदा करुन जातपंतायतींना काेणालही जातीतून बहिष्कृत करण्यास तसेच काैमार्याची चाचणी घेण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. तरीही पाेलिसांपासून लपवून असे प्रकार घडत आहेत. गृहविभाग आणि सामाजिक न्याय विभागाने एकत्रित येऊन याविराेधात पाऊले उचलायला हवीत. तसेच समाजप्रबाेधनासाठी सामाजिक आणि राजकीय इच्छाशक्तीची आवश्यकता आहे. 

टॅग्स :Neelam gorheनीलम गो-हेPuneपुणे