शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

पीएमपी प्रवाशांनाे, फाेटाे काढा बक्षीस मिळवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 1:46 PM

पीएमपीचे चालक जर बस चालवत असताना फाेनवर बाेलताना अाढळल्यास प्रवासी त्यांच्या फाेटाे काढून पीएमपीला पाठवू शकतात. त्या छायाचित्राची शहानिशा करुन पीएमपी प्रवाशाला बक्षीस देणार अाहे.

ठळक मुद्देएक हजार रुपयांचे मिळणार बक्षीसमहिन्यातून तीन छायाचित्रासाठीच बक्षीस मिळणार

पुणे : पीएमपीचे चालक बस चालवत असताना अनेकदा फाेनवर बाेलताना दिसून येतात. याबाबत पीएमपीकडे अनेकदा तक्रार करुनही फारशी कारवाई हाेत नसल्याते चित्र अाहे. बस चालवत असताना फाेनवर बाेलत असताना चालक स्वतःसाेबतच प्रवाशांचा जीवही धाेक्यात घालत असतात. परंतु अाता एखादा चालक बस चालवत असताना फाेनवर बाेलत असेल तर प्रवाशांना बक्षीस मिळविण्याची नामी संधी अाहे. पीएमपीकडून चालत्या बसमध्ये माेबाईलवर बाेलताना चालकाचा फाेटाे पाठविणाऱ्यांना एक हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार अाहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाने या निर्णयावर शिक्कामाेर्तब केले असून, त्याची अंमलबजावणी सुरु करण्यात अाली अाहे.      पीएमपी चालकांची मुजाेरी अनेक घटनांमधून समाेर अाली अाहे. नुकताच रात्रीच्या वेळी प्रवास करत असताना एका महिलेला महिलांसाठी राखीव असणाऱ्या ठिकाणी जागा करुन न देता तिच्या पतीला खाली उतरविण्याचा प्रकार घडला हाेता. पीएमपीचे कर्मचारी प्रवाशांना सहकार्य करत नसल्याचे चित्र अाहे. काही वर्षांपूर्वी पीएमपी प्रशासनाने या चालकांना अावर घालण्यासाठी ही याेजना तयार केली हाेती. त्यानुसार चालकांचे छायाचित्र काढणाऱ्या प्रवासी, नागरिकांना एक हजार रुपये बक्षीस दिले जात हाेते. मागील वर्षी ही याेजना गुंडाळण्यास अाली हाेती. ही याेजना पुन्हा सुरु करण्यासाठी प्रवासी संघटनांनी पाठपुरावा केला हाेता. त्यानुसार पीएमपीच्या अध्यक्षा नयना गुंडे यांनी याेजनेला मान्यता दिली अाहे.      नवीन याेजनेनुसार माेबाईलवर बाेलताना चालक अाढळून अाल्यास त्याला 2 हजार रुपयांचा दंड केला जाईल. या दंडाची रक्कम त्याच्या वेतनातून वसूल करण्यात येणार अाहे. त्यापैकी एक हजार रुपये छायाचित्र पाठविणाऱ्यास, तर एक हजार रुपये कामागार कल्याण याेजनेमध्ये वर्ग केले जातील तसेच तक्रारदाराला महिन्यातून केवळ तीन छायाचित्रांसाठीच बक्षीस मिळणार अाहे. उर्वरित छायाचित्रांसाठीची बक्षीस रक्कम कामगार कल्याण याेजनेत जमा केली जाईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात अाली अाहे.     चालत्या बसमध्ये फाेनवर बाेलणाऱ्या चालकाचे छायाचित्र पीएमपीच्या वाहतूक विभागाकडे किंवा संकेतस्थळावर पाठवावे लागणार अाहे. या छायाचित्रावर बसचा क्रमांक अावश्यक अाहे. त्याचबराेबर प्रवासाची वेळ, मार्ग क्रमांक व बस काेठून काेठे जात हाेती, ही माहिती नमूद करणे अावश्यक अाहे. त्यानुसार शहानिशा करुन संबंधितांना बक्षिसाची रक्कम दिली जाणार अाहे. प्रवाशांना छायाचित्र tmope@pmpml.org या ई-मेलवर पाठवायची अाहेत. किंवा 020-24545454 या हेल्पलाईनवर संपर्क साधता येईल. 

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलTravelप्रवासMobileमोबाइलNayana Gundeनयना गुंडे