शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कृषीला अर्थसंकल्पातून बाहेर काढा! बुधाजीराव मुळीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 02:18 IST

कृषी माल पिकवूनही शेतकरी कायमच मागास कसा ? हा नेहमीचाच प्रश्न झाला आहे. कृषी क्षेत्राला जितके द्यायला हवे तितके अजूनही देण्यात आलेले नाही. त्यामुळे केंद्रीय अंदाजपत्रकातून कृषी क्षेत्राला बाहेर काढण्याची गरज आहे.

कृषी माल पिकवूनही शेतकरी कायमच मागास कसा ? हा नेहमीचाच प्रश्न झाला आहे. कृषी क्षेत्राला जितके द्यायला हवे तितके अजूनही देण्यात आलेले नाही. त्यामुळे केंद्रीय अंदाजपत्रकातून कृषी क्षेत्राला बाहेर काढण्याची गरज आहे. उत्पादन खर्चावर आधारित दर ही जबाबदारी सरकारने स्वीकारली पाहिजे. कृषी क्षेत्राला संपूर्ण संरक्षण देणारे धोरण असावे. त्याच्या अंमलबजावणीचे काही अधिकार राज्यांना द्यावेत, त्याचा परतावा केंद्राने राज्यांना द्यावा, अशी भूमिका ज्येष्ठ कृषितज्ज्ञ बुधाजीराव मुळीक यांनी मांडली.शेतीकरिता मागील तीन अर्थसंकल्प तितकेसे चांगले नव्हते. ग्रामविकास आणि कृषी असा अर्थसंकल्प उपयोगाचा नाही. कारण, ग्रामीण विकास आणि कृ षी या दोन्ही बाबी अत्यंत वेगळ्या आहेत. म्हणजे ग्रामीण भागात स्वच्छतागृह बांधली म्हणजे कृषी विकास नव्हे. त्याचा शेतीला काय फायदा ? असे गेले काही अर्थसंकल्प होते.गेली दोन वर्षे देशात समाधानकारक पाऊस झाला; मात्र नोव्हेंबर २०१६ मध्ये लागू केलेल्या नोटाबंदीमुळे शेतकºयांचे कंबरडे मोडले. भाज्या या रोखीवर खरेदी केल्या जातात. त्यामुळे रोखतेअभावी भाज्यांची खरेदी कमी झाली. त्यामुळे मागणी निम्म्याने घटून शेतकºयांचे नुकसान झाले. चांगल्या पावसामुळे या काळात शेतकºयांनी मोठ्या प्रमाणावर पालेभाज्या आणि फळपिके घेतली. त्यामुळे नुकसानीची तीव्रता वाढली. हा त्यावेळचा परिणाम.मात्र, एकूण शेतीचे धोरण पाहिल्यास वीस ते बावीस पिकांनाच हमी भाव आहे. केळी, द्राक्ष, आंबे, भाजीपाला, कांदा, बटाटा अशा अनेक फळांना आणि भाज्यांना हमीभाव नाही. केवळ वीस ते बावीस पिकांवर आज कृषी विकास दर काढला जातो. ही पद्धत अत्यंत चुकीची आहे. खरेतर जवळपास सर्वच पिकांना हमीभाव द्यावेत. उत्पादनखर्चावर आधारित भाव कोणत्याही व्यवसायाचे गणित असते. मग, तुम्ही ट्रॅक्टर खरेदी करा की साबणासारखी वस्तू, त्यांची छापील किंमत अथवा अधिकतम किरकोळ किंमत ही उत्पादनाच्या साधारणत: तिप्पटच असते. तेच गणित कृषीमालाबाबत का असू नये ? सेवा उद्योगात महागाई प्रमाणे लगेचच किमतीत चढ-उतार होतात. नोकशहांना वेतन आयोग असतो, कारखान्यात तयार होणाºया वस्तूंत किमान ३० टक्के नफा असतो. काही वस्तूंच्या किमतीतर उत्पादन खर्चाच्या तिप्पट असतात; मात्र या दर प्रणालीचा शेती मालाला काहीच फायदा नाही. काही पिकांना हमीभाव असला, तरी हा हमीभाव शेतकºयांना न्याय देत नाही, हे सरकारनेच मान्य केले आहे. या स्थितीत बदल झाला पाहिजे; अन्यथा जगात एक क्रमांक गहू, दूध-भाजीपाल्यात आपण अव्वल राहतो, मात्र शेतकरी मागासच. याचा अर्थ आपली शेती उत्पादन मापन करण्याची पद्धत चुकीची आहे. शेतकºयांना मागासलेपणास सरकारची चुकीची धोरणे कारणीभूत आहेत. त्यामुळे सरकारने त्यांना संपूर्ण कर्जमाफी दिली पाहिजे.सरकारने जाहीर केले आहे की, जल स्रोतापासून शेतीपर्यंत भूमिगत वाहिनीने पाणी पोहोच झाले पाहिजे. स्मार्ट सिटीपेक्षा त्याची अधिक गरज आहे. मग, त्या जोडीला खेड्यांपासून रस्ते, शेतमाल साठविण्यासाठी केंद्रिभूत गोदाम यासाठी प्रत्यक्ष तरतूद केली पाहिजे. आस्मानी अथवा कोणत्याही संकटापासून संरक्षण देण्याची जबाबदारी सरकारची आहे. अ‍ॅक्ट आॅफ गॉडप्रमाणे अ‍ॅक्ट आॅफ गव्हर्नमेंट महत्त्वाचे आहे. त्यामुळे शेतीत काम करणाºया ६० वर्षांवरील व्यक्तींच्या निवृत्ती योजनेची घोषणा करायला हवी.शेती ही देशाची उत्पादक गुंतवणूक आहे. उद्योगांना विशेष सवलती सरकार जाहीर करते. मग, शेतीवरील भांडवली खर्चावर सरकारने सवलत द्यावी. मग ती यांत्रिकीकरण, ट्युबवेल अशा विविध स्वरूपाचा खर्च असो, त्यासाठी सरकारने बिनव्याजी पैसे द्यावेत. मग भले अनुदान रद्द करावे. अशा अनुदानामुळे बियाणे आणि सिंचन सुविधा देणाºया कंपन्याच गब्बर झाल्या आहेत.शेतीचा विकास करायचा असेल तर एखादा तरी अर्थसंकल्प शेतीला वाहिलेला असावा. अथवा रेल्वेप्रमाणे कृषी अर्थसंकल्प वेगळा करावा.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीIndiaभारतBudgetअर्थसंकल्पBudget 2018अर्थसंकल्प २०१८