महिला अत्याचार रोखण्यासाठी उपाययोजना करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:24 IST2021-09-02T04:24:48+5:302021-09-02T04:24:48+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्याल्गेल्या तीन-चार दिवसांत महिलांवर तसेच मुलींवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. पुणे, औरंगाबाद, रत्नागिरी ...

Take measures to prevent violence against women | महिला अत्याचार रोखण्यासाठी उपाययोजना करा

महिला अत्याचार रोखण्यासाठी उपाययोजना करा

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : राज्याल्गेल्या तीन-चार दिवसांत महिलांवर तसेच मुलींवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. पुणे, औरंगाबाद, रत्नागिरी येथील महिला अत्याचाराच्या घटनांची तत्काळ दखल घेऊन त्या रोखण्यासाठी उपाययोजना गरजेच्या आहेत, अशी स्पष्ट सूचना विधानसभेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पोलीस महासंचालक यांना केली आहे.

पिंपरी-चिंचवड येथील चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीचा व्हिडीओ काढून तसेच ब्लॅकमेल करून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या घटनेतील आरोपी अल्पवयीन असून एक अटकेत आहे. तर दोन आरोपी फरार आहेत. पुण्यातील दत्तवाडी पोलीस ठाण्याअंतर्गत गतिमंद महिलेवर चार आरोपींनी अत्याचार केला आहे. चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

अशाच प्रकारे औरंगाबाद आणि रत्नागिरी येथेही घडल्या आहेत. पॉस्कोच्या घटनेत निकाल लागण्यासाठी वेळ लागत आहे. त्यामुळे विधी व न्याय विभागाची मदत घेण्यात यावी, पीडितांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे समुपदेशन करण्यासाठी योग्य पावले उचलावीत, अशी सूचना डॉ. गोऱ्हे यांनी पोलीस महासंचालकांना केली आहे.

Web Title: Take measures to prevent violence against women