शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

अखेरच्या निवडणुकीत एकदा संधी द्या : दिलीप मोहिते-पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 13:18 IST

विधानसभेपूर्वी मला जेलमध्ये पाठवून निवडणूक जिंकण्याचा विरोधकांचा डाव होता. मात्र, न्यायव्यवस्थेने मला जामीन मंजूर केला....

राजगुरुनगर/शेलपिंपळगाव : ‘आता माझी ही शेवटचीच निवडणूक असून मायबाप जनतेने एकदा संधी द्यावी,’ असे माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी सांगितले. राजगुरुनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या विजयी निर्धार तथा उमेदवारी अर्ज दाखल सभेत ते बोलत होते. या प्रसंगी रामदास ठाकूर, ऋषीकेश पवार, बाळशेठ ठाकूर, सुगंधा शिंदे, डी. डी. भोसले, तुकाराम कांडगे, निर्मला पानसरे, दीपाली काळे, अरुण चांभारे, सतीश राक्षे, संध्या जाधव, वंदना सातपुते, वैशाली गव्हाणे, अरुण चौधरी, कैलास लिंभोरे, विलास कातोरे, चंद्रकांत इंगवले, नवनाथ होले, विनायक घुमटकर, सयाजीराजे मोहिते, अरुण थिगळे, सतीश राक्षे, धैर्यशील पानसरे, बबनराव कुऱ्हाडे, संध्या जाधव, रूपाली जाधव, सुरेखा मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते.मोहिते-पाटील म्हणाले, ‘‘तालुक्यात जातीपातीचे राजकारण केले नाही. लोकसभेला आम्ही डॉ. अमोल कोल्हेंना मोठे मताधिक्य देऊन खासदार केले. याउलट, सध्या तालुक्यात जातीपातीचे राजकारण केले जात आहे. चाकणच्या मराठा आंदोलनातील मोर्चात सामील होऊन समाजासाठी भाषण केले; मात्र एका वर्षानंतर सत्तेचा दुरुपयोग करून माझ्यावर गुन्हा दाखल केला. विधानसभेपूर्वी मला जेलमध्ये पाठवून निवडणूक जिंकण्याचा विरोधकांचा डाव होता. मात्र, न्यायव्यवस्थेने मला जामीन मंजूर केला. त्यामुळे जनता आता अशा विचारांच्या लोकांना घरी पाठविल्याशिवाय राहणार नाही.’’ या वेळी रामदास ठाकूर, ऋषिकेश पवार, डी. डी. भोसले, तुकाराम कांडगे, वंदना सातपुते आदींनी भाषणे केली. सुनील थिगळे, पूजा थिगळे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. ..........तालुक्यात ३० ते ३२ वर्षे राजकारण केले. सरपंच ते आमदार या काळात कोणी दुखावले गेले असेल तर माफ करा. विकासकामे करीत असताना एकाही रुपयाचा भ्रष्टाचार कधी केला नाही. मागील पाच वर्षांत आमदार नसतानाही तालुक्यातील जनतेने तसे जाणवू दिले नाही, असे मोहिते पाटील म्हणाले.  

टॅग्स :KhedखेडMLAआमदारElectionनिवडणूकvidhan sabhaविधानसभा