बोगद्याच्या खोदकामात घ्या काळजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:11 IST2020-12-02T04:11:03+5:302020-12-02T04:11:03+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : भुयारी मार्गातील सिव्हिल कोर्टनंतरचा स्वारगेटपर्यंतचा बोगदा शहराच्या मध्यभागातून जातो. या बोगद्याच्या खोदकामात पूर्ण काळजी ...

Take care in tunnel excavation | बोगद्याच्या खोदकामात घ्या काळजी

बोगद्याच्या खोदकामात घ्या काळजी

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : भुयारी मार्गातील सिव्हिल कोर्टनंतरचा स्वारगेटपर्यंतचा बोगदा शहराच्या मध्यभागातून जातो. या बोगद्याच्या खोदकामात पूर्ण काळजी घ्यावी, ठेकेदार कंपनीच्या कामावर देखरेख ठेवावी, अशी सूचना महामेट्रो कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी केली.

डॉ. दीक्षित यांनी मंगळवारी (दि. १) महामेट्रोची आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. केली. दीक्षित यांनी सकाळी मेट्रोच्या भुयारी मार्ग व अन्य कामांची पाहणी केली. संचालक (प्रकल्प) अतुल गाडगीळ, रामनाथ सुब्रम्हण्यम, विनोद अगरवाल आदी प्रमुख बैठकीला उपस्थित होते. तत्पुर्वी दीक्षित यांनी सकाळी शिवाजीनगर व सिव्हिल कोर्ट येथील कामाची पाहणी केली.

Web Title: Take care in tunnel excavation