कोरोनासह इतर सर्व संकटे गणराया दूर कर- हर्षवर्धन पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:12 IST2021-09-21T04:12:26+5:302021-09-21T04:12:26+5:30

इंदापूर : राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कुटुंबाने मागील दहा दिवस पर्यावरणपूरक गणरायाची प्रतिष्ठापना करून गणरायाची भक्तिभावाने सेवा ...

Take away all other troubles including Corona - Harshvardhan Patil | कोरोनासह इतर सर्व संकटे गणराया दूर कर- हर्षवर्धन पाटील

कोरोनासह इतर सर्व संकटे गणराया दूर कर- हर्षवर्धन पाटील

इंदापूर : राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कुटुंबाने मागील दहा दिवस पर्यावरणपूरक गणरायाची प्रतिष्ठापना करून गणरायाची भक्तिभावाने सेवा केली. गणरायाला निरोप देताना हर्षवर्धन पाटील यांनी ‘कोरोनासह इतर सर्व संकटे गणराया दूर करून पुढील वर्षी लवकर या’ असे म्हणत भावपूर्ण वातावरणात पर्यावरणपूरक विसर्जन करीत निरोप दिला.

हर्षवर्धन पाटील यांच्या पत्नी भाग्यश्री पाटील, जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील, निरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी मनोभावे गणेशाची आरती करून ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असा जयघोष करीत गणरायाला भावपूर्ण निरोप दिला.

--

फोट क्रमांक : २० इंदापूर हर्षवर्धन पाटील

फोटो ओळ : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील कुटुंबीयांनी पर्यावरणपूरक गणेश विसर्जन केले.

Web Title: Take away all other troubles including Corona - Harshvardhan Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.