शेतकऱ्यांनो योजनांचा फायदा घ्या

By Admin | Updated: January 9, 2017 02:50 IST2017-01-09T02:50:47+5:302017-01-09T02:50:47+5:30

आमचे सरकार हे शेतकऱ्यांचा बाजूने आहे. शेतकरी टिकण्यासाठी त्याला बियाणे, खते, बाजारभाव मिळून देण्यासाठी प्रयत्न करत आहे.

Take advantage of farmers' schemes | शेतकऱ्यांनो योजनांचा फायदा घ्या

शेतकऱ्यांनो योजनांचा फायदा घ्या

वडगाव मावळ : आमचे सरकार हे शेतकऱ्यांचा बाजूने आहे. शेतकरी टिकण्यासाठी त्याला बियाणे, खते, बाजारभाव मिळून देण्यासाठी प्रयत्न करत आहे. शेतकऱ्यांनी स्वाभिमानाने जगण्यासाठी सरकार अनेक योजना राबवत असून आपण त्याचा फायदा घ्यावा, असे आवाहन राज्याचे महसूल मंत्री चंद्रकात पाटील यांनी येथे मावळ तालुका पंचायत समिती नूतन इमारतीच्या उद्घाटन समारंभ व भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात व्यक्त केले.
मावळ पंचायत समितीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन फीत कापून पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार बाळा भेगडे, जेष्ठ नेते केशवराव वाडेकर पुणे जिल्हा मुख्य अधिकारी यशवंत शितोळे, माजी आमदार दिगंबर भेगडे, रूपरेखा ढोरे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे, सदस्य गुलाब वरघडे, दत्ता गुंड, सविता गावडे, सभापती मंगला वाळूंजकर, उपसभापती गणेश गायकवाड, राजाराम शिंदे, ज्ञानेश्वर दळवी, दिपाली म्हाळस्कर, रंजना गराडे, आशाताई देशमुख, ललिता कोतुळकर, सचिन घोट्कुले, हरीश कोकरे, गट विकास अधिकारी निलेश काळे, सह गटविकास अधिकारी आपासाहेब गुजर, लोणावळा नगराध्यक्षा सुरेखा जाधव, तळेगाव नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, उपनगराध्यक्ष सुनील शेळके, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी यांनी केले. खासदार बारणे म्हणाले, नवीन इमारतीत कामे वेगात होण्याची अपेक्षा व्यक्त केली. प्रकाश देवळे, शरद ढमाले, माऊली शिंदे, अविनाश बवरे, प्रशांत ढोरे, भास्करराव म्हाळस्कर, गुलाबराव म्हाळस्कर, जितेंद्र बोत्रे, बाळासाहेब घोटकुले उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Take advantage of farmers' schemes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.