शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

कचरा न उचलणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2020 13:42 IST

नागरिक सदस्यांनी वाचला समस्यांचा पाढा

ठळक मुद्देकाही नागरिकांनी पिण्याच्या पाण्याच्या समस्येविषयी तक्रारी केल्याकाम जर व्यवस्थितपणे केले जात नसेल तर महापालिकेने कारवाई करायला हवी

पिंपरी :  महापालिकेच्या ड क्षेत्रिय परिसरातील विविध अडचणी व नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी बैठक घेतली. या बै़ठकीत नागरिकांनी आणि नगरसेवकांनी कचरा संकलन आणि पाणीपुरवठ्याच्या समस्यांचा पाढा वाचला. त्यावर कचरा न  उचलण्याचे काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी, असे निर्देश महापौरांनी प्रशासनास दिले आहेत.महापालिकेच्या ड क्षेत्रिय  कार्यालयांमधील सभागृहात सकाळी अकराला बैठक आयोजित केली होती. या बैठकीस शिवसेना गटनेते राहूल कलाटे, ड प्रभाग अध्यक्ष शशिकांत कदम, महिला व बालकल्याण समिती सभापती निर्मला कुटे, जैव विविधता व्यवस्थापन समिती अध्यक्षा उषा मुंढे, नगरसदस्य संदिप कस्पटे, सागर आंगोळकर, नगरसदस्या आरती चोंधे, ममता गायकवाड, रेखा दर्शले, प्रभारी प्रभाग अधिकारी सिताराम बहुरे, कार्यकारी अभियंता रामदास तांबे, देवण्णा गट्टूवार, प्रमोद ओंबासे, जनसंपर्क अधिकारी रमेश भोसले संबंधित उपअभियंता उपस्थित होते. यावेळी वाकड, पिंपळे निलख भागातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. नगरसेविका आरती चौंधे यांनी कचऱ्याची समस्या मांडली.कचरा संकलनाचे काम नियमितपणे आणि सुनियोजितपणे होत नाही, कोण कोणत्या भागातील कचरा उचलते याची माहिती लोकप्रतिनिधींना होणे गरजेचे आहे, असे मत चौंधे यांनी मांडले. त्यानंतर कलाटे यांनी कचऱ्याच्या गाड्या वेळेवर येत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. याबाबत जबाबदारी निश्चित करणे गरजेचे आहे. परिसरात कचरा उचलण्याचे काम कोणत्या संस्थेस आहे, त्यांची नावे, संपर्क क्रमांक, आरोग्य अधिकाऱ्यांची नावे डिस्प्ले करायला हवीत, अशी सूचना केली. त्यानंतर महापौरांनी कचरा उचलण्याची जबाबदारी असणाऱ्या संस्थेला खडसावले. काम जर व्यवस्थितपणे केले जात नसेल तर महापालिकेने कारवाई करायला हवी, अशा सूचना केल्या.त्यानंतर काही नागरिकांनी पिण्याच्या पाण्याच्या समस्येविषयी तक्रारी केल्या. पाणी नियमित आणि वेळेवर पुरसे मिळायला हवेत. नागरिक कर भरतात त्यांना सुविधा देण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. नागरिकांच्या समस्येकडे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याच्या तक्रारीही करण्यात आल्या. त्यावर महापौरांनी पाणी समस्या सोडविण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेऊन मार्ग काढायला हवा, अशी सूचना केली. तसेच या बैठकीत प्रभागातील रस्त्याच्या दुरूस्तीची मागणी केली. त्यावर रस्ते दुरुस्ती, सुरळीत व समप्रमाणात पाणीपुरवठा तसेच आरोग्यविषयक समस्यांचे निराकरण करण्यासाठी अधिकाºयांना सुचना दिल्या.

टॅग्स :Puneपुणे