गर्भवतच्या मृत्यूप्रकरणी दोषींवर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:28 IST2021-01-13T04:28:43+5:302021-01-13T04:28:43+5:30

तळेघर : फलोदे (ता.आंबेगाव)येथील गर्भवती महिला व बाळाच्या झालेल्या मृत्यु प्रकरणी दोषींवरती कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी अखिल ...

Take action on the culprits in the death of a pregnant woman | गर्भवतच्या मृत्यूप्रकरणी दोषींवर कारवाई करा

गर्भवतच्या मृत्यूप्रकरणी दोषींवर कारवाई करा

तळेघर : फलोदे (ता.आंबेगाव)येथील गर्भवती महिला व बाळाच्या झालेल्या मृत्यु प्रकरणी दोषींवरती कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने चौकशी समितीचे अध्यक्ष जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. अशोक नांदापुरकर यांना देण्यात आले.

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम दुर्गम भागातील फलोदे या गावातील पुनम दत्तात्रय लव्हाळे हीचा वेळेवर उपचार न मिळाल्याने तसेच रुग्णवाहिके अभावी मृत्यू झाला होता. या संदर्भात चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीने सोमवारी (दि ११) पिडित कुटुंबाला भेट देत सर्व माहिती घेतली.

यावेळी किसान सभेने तळेघर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर उपलब्ध होवू न शकणाऱ्या डॉक्टरांवर कडक कारवाईची मागणी केली. प्राथमिक आरोग्य केंद्रापासून घोडेगावला शासकीय रुग्णवाहिका कशामुळे उपलब्ध झाली नाही ते पाहून यास जे कारणीभूत असतील त्या संबंधितावर कारवाई व्हावी. प्राथमिक आरोग्य केंद्र, तळेघर व आंबेगाव तालुक्यातील सर्वच आदिवासी भागात निवासी डॉक्टर उपलब्ध व्हावेत. प्राथमिक आरोग्य केंद्र तळेघर,अडीवरे व तिरपाड येथील विविध तक्रारी विषयी जनसुनवाई घ्यावी, अशा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी किसान सभेचे आंबेगाव तालुका अध्यक्ष कृष्णा वडेकर,सचिव अशोक पेकारी व उपाध्यक्ष राजू घोडे उपस्थित होते.

फोटो : जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. अशोक नांदापुरकर यांना निवेदन देतांना आखिल भारतीय किसान सभेचे पदाधिकारी.

Web Title: Take action on the culprits in the death of a pregnant woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.