शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कामात 'झोल' करणाऱ्या अभियंत्यांवर कारवाई करा: शिवसेना व काँग्रेसची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 20:01 IST

महापालिका आयुक्तांनी बजावल्या होत्या कारणे दाखवा नोटिसा...

पुणे : आर्थिक संकटाचा सामना मारीत असलेल्या महापालिकेच्या कोट्यवधींच्या निधीमध्ये डल्ला मारण्याचा प्रयत्न सुरू असून 'मार्च एंड'च्या विकासकामांच्या आडून भ्रष्टाचार पोसला जात आहे. पालिका आयुक्तांनी १९ अभियंत्यांना नोटिसा बजावल्या आहेत. या प्रकरणांची सनदी लेखापालांमार्फत चौकशी करून दोषी अभियंत्यांवर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. याबाबतचे निवेदन महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना देण्यात आले आहे.

'मार्च एंड' च्या कामांमध्ये क्षेत्रीय कार्यालय स्तरावर करण्यात आलेली कामे निकृष्ठ दर्जाची असून अनेक कामे अशास्त्रीय पद्धतीने करण्यात आली आहेत. अनेक कामे अर्धवट असताना बिले काढण्यात आली आहेत. पालिका आयुक्तांनी या कामांवर लक्ष ठेवण्यासाठी दक्षता पथक नेमले आहे. या पथकाने २३ कामाची प्रत्यक्ष पाहणी करीत त्याचा सविस्तर अहवाल आयुक्तांना सादर केला. यामध्ये सर्वाधिक दोष 'थर्ड पार्टी ऑडिट'ला देण्यात आलेला आहे. अहवालाच्या आधारे आयुक्तांनी एक परिमंडळ उपायुक्त, दोन सहाय्यक आयुक्त, तीन कार्यकारी अभियंता यांच्यासह ११ कनिष्ठ अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली.

यासंदर्भात शहर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे. आयुक्तांच्या कार्यपद्धतीचे समर्थन करतानाच दर्जाहीन कामे करणारे, कामे न करताच बिले काढणारे तसेच चुकीचे मोजमाप करून कोट्यवधी रुपयांचा अपहार करणार्‍यांना पाठीशी घालू नये. मागील चार वर्षांत केलेल्या कामांची तपासणी करुन सर्व भ्रष्टाचार खणून काढावा. या कामांचे ऑडीट करण्यासाठी नियुक्त केलेल्या थर्ड पार्टी एजन्सींचीही चौकशी करावी. या प्रकरणात दोषी आढळणार्‍यांची सनदी लेखापालांमार्फत चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी  करण्यात आली आहे. शिवसेनेचे शहर प्रमुख संजय मोरे, श्याम देशपांडे, गजानन थरकुडे, विजय देशमुख, गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी हे निवेदन दिले.  ------- प्रदेश कॉंग्रेसचे सचिव संजय बालगुडे यांनीही आयुक्तांना निवेदन दिले आहे. पालिकेच्या निविदेप्रमाणे काम न करताच मोठ्या प्रमाणावर बिले अदा करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. कामाची पाहणी न करताच थर्डपार्टी इन्स्पेक्शन करणार्‍या संस्था तसेच अधिकारी फाईलवर सह्या करतात. ठेकेदारांसोबतच अधिकारीही दोषी आहेत. कामे न करताच बिले घेणार्‍या ठेकेदारांचीही चौकशी करून कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcommissionerआयुक्तShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेस