अवैध दारूविक्रीच्या तक्रारींची दखल घ्या

By Admin | Updated: April 28, 2017 06:00 IST2017-04-28T06:00:26+5:302017-04-28T06:00:26+5:30

अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी स्थापण्यात आलेल्या ग्रामरक्षक दलांना सहकार्य करण्यासोबतच नागरिकांच्या तक्रारींची

Take into account illegal ammunition complaints | अवैध दारूविक्रीच्या तक्रारींची दखल घ्या

अवैध दारूविक्रीच्या तक्रारींची दखल घ्या

पुणे : अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी स्थापण्यात आलेल्या ग्रामरक्षक दलांना सहकार्य करण्यासोबतच नागरिकांच्या तक्रारींची तत्काळ दखल घ्यावी, अवैध दारूविक्रीवर कडक कारवाई कराव,अशा सूचना राज्याचे ऊर्जा आणि उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
बावनकुळे यांच्या हस्ते राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अभिलेख कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. त्यांनी उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाला भेट देऊन पाहणी केल्याची माहिती अधीक्षक मोहन वर्दे यांनी दिली. यावेळी विभागीय उपायुक्त अर्जुन ओव्होळ, प्राज कंपनीचे अतुल मुळे, सतीश चतुर्वेदी, अजिंक्य कुदळे, अ‍ॅमेनोरा सिटीचे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे उपस्थित होते. उत्पादन शुल्क विभागाच्या बंडगार्डन येथील कार्यालयामध्ये अद्ययावत अभिलेख कक्ष (कॉम्पॅक्टर) सुरू करण्यात आला आहे. कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त अभिलेख जपून ठेवणे शक्य झाले आहे. बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. मनुष्यबळ कमी असले तरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून लोकाभिमुख काम करून आदर्श निर्माण करण्याबाबत तसेच दारूचे अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्यासंदर्भात सूचना दिल्या.
उपअधीक्षक सुनील फुलपगार यांनी आभार मानले.

Web Title: Take into account illegal ammunition complaints

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.