अनाथांसाठी तायक्वोंदो प्रशिक्षण

By Admin | Updated: January 9, 2017 02:43 IST2017-01-09T02:43:08+5:302017-01-09T02:43:08+5:30

कान्हे फाटा येथील साईबाबा सेवाधाम संस्थेत तीन दिवसीय संस्कार शिबीर व तायक्वोंदो ब्लॅकबेल्ट प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले होते.

Taekwondo training for orphans | अनाथांसाठी तायक्वोंदो प्रशिक्षण

अनाथांसाठी तायक्वोंदो प्रशिक्षण

कामशेत : कान्हे फाटा येथील साईबाबा सेवाधाम संस्थेत तीन दिवसीय संस्कार शिबीर व तायक्वोंदो ब्लॅकबेल्ट प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले होते. संस्थेतील अनाथ व अपंग मुलींनीही या शिबिरात उत्स्फूर्त सहभाग घेतला.
राजू अगरवाल यांच्या सहयोगाने मावळातील ४५-५० मुले व मुलींसाठी या शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात आत्मसंरक्षण, आत्मविश्वास, स्ट्रीट फाईट, कराटे, तायकांदो, योग प्रशिक्षण, स्वावलंबनाचे धडे व प्रात्यक्षिकांसह सराव आदींचे प्रशिक्षण मुलांना देण्यात आले. प्रशिक्षण मुलं व मुलींनी यावेळी संस्थेतील अपंग व मतिमंद मुलांना तायक्वोंदोची प्रात्यक्षिके करून दाखवली. यावेळी विशेष मुलांनीही सरावात सहभाग घेतला. या शिबिरासांठी आशा अगरवाल, अनुप सहस्त्रबुद्धे, रवी पवार, मनोज साळुंखे, बबन पिलाने, हर्षदा बोरकर, किरण यादव, दीपक अगरवाल, योग प्रशिक्षक सुरेश राठोड आदींनी परिश्रम घेतले.(वार्ताहर)
४शिबिरात सहभागी झालेल्यांना वल्ड तायक्वोंदो फेडरेशन दक्षिण
कोरिया या आंतरराष्ट्रीय संस्थेद्वारे प्रमाणपत्र देण्यात आले. या वेळी अखिलेश पत्रा, गगन मतकर, ओंकार बोरकर, काव्या माहुलकर, वैष्णवी घिसारे, विवेक जैन, अभिशांश सिंग, हर्षद बोरकर, मयूर पाटील, रोहित खांदेभरड, पुणेश पोरवाल (फर्स्ट डान ब्लॅक बेल्ट), किरण यादव, श्रीनिवास तळेगावकर, रोहन झोरे, महावीर गुंडेजा ( सेकंड डान ब्लॅकबेल्ट), बबल पिलाने (थर्ड डान ब्लॅकबेल्ट) आदींना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

Web Title: Taekwondo training for orphans