तडीपार गुंडाकडून पोलिसांना धक्काबुक्की
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 04:04 IST2020-11-29T04:04:39+5:302020-11-29T04:04:39+5:30
पुणे : शहरातून तडीपार करण्यात आले असताना कोयता घेऊन दहशत पसरवत असलेल्या गुंडाला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांना धक्काबुक्की करण्याचा प्रकार ...

तडीपार गुंडाकडून पोलिसांना धक्काबुक्की
पुणे : शहरातून तडीपार करण्यात आले असताना कोयता घेऊन दहशत पसरवत असलेल्या गुंडाला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांना धक्काबुक्की करण्याचा प्रकार तळजाई येथील सुवर्ण मंदिरासमोर घडला.
ऋषिकेश ऊर्फ बारक्या संजय लोंढे (वय २०, रा. तळजाई वसाहत, पद्मावती) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
याप्रकरणी पोलीस शिपाई प्रदीप शिंदे यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लोंढे सराईत गुंड आहेत. त्याला शहरातून तडीपार करण्यात आले आहे. लोंढे तळजाई वसाहत परिसरात कोयता घेऊन फिरत असून तो या भागातील रहिवाशांना धमकावत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांचे पथक तेथे पोहोचले. लोंढेला पकडण्यासाठी गेलेले पोलीस शिपाई शिंदे आणि त्यांच्याबरोबर असलेल्यांना लोंढेने धमकावले. त्यांच्याबरोबर झटापट केली. सरकारी कामात अडथळा आणणे तसेच धमकावल्या प्रकरणी लोंढेला अटक करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक व्ही. बी. गुजर तपास करत आहेत.