शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

तडीपार गुंडाचा पोलीस उपनिरीक्षकावर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 12:50 IST

सुदैवाने सावध असलेल्या पोलिसांनी हा हल्ला चुकविला

ठळक मुद्देदोघांवर खुनाचा प्रयत्न करणे व सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल

पुणे : आरोपीला ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलीस उपनिरीक्षकावर तडीपार गुंडाने कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने सावध असलेल्या पोलिसांनी हा हल्ला चुकविला. पोलीस उपनिरीक्षकांसमवेत असलेल्या पोलिसांना वीट मारली.

याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी कुमार भागवत चव्हाण याला अटक केली असून सराईत गुन्हेगार प्रतिक पृथ्वीराज कांबळे (दोघे ही़ रा. मंगळवार पेठ) याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक नरेश केशव वाडेवाले यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना मंगळवार पेठेतील सार्वजनिक स्वच्छतागृहाजवळ रविवारी सायंकाळी ५ वाजता घडली. प्रतिक कांबळे याला तडीपार करण्यात आले आहे. 

मंगळवार पेठेत लावण्यात आलेले शासकीय कॅमेरे आरोपींनी हलविले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यांना ताब्यात घेण्यासाठी वाडेवाले व त्यांचे सहकारी मंगळवार पेठेत गेले होते. त्यावेळी प्रतिक कांबळे याने वाडेवाले यांना मला पकडतो का मी आता तुला जिवंत सोडत नाही, असे म्हणून हातातील कोयत्याने त्यांच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. कुमार चव्हाण याने विट उचलून वाडेवाले यांच्याबरोबर असलेल्या पोलीस कर्मचार्‍यांना मारली. त्त्यांनी कुमार चव्हाण याला पकडले. तोपर्यंत प्रतिक कांबळे हा पळून गेला.

फरासखाना पोलिसांनी दोघांवर खुनाचा प्रयत्न करणे व सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे़.याबाबत पोलीस उपनिरीक्षक नरेश वाडेवाले यांनी सांगितले की, तेथील कॅमेरे हलविल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार आम्ही मंगळवार पेठेतील बुद्ध विहाराजवळ आरोपीला ताब्यात घेण्यासाठी गेलो होतो. तेवढ्यात तडीपार गुंड प्रतिक कांबळे हा हातात कोयता घेऊन धावत आला. आम्ही सावध असल्याने त्याचा वार चुकविला. तेव्हा तो कोयत्याचा धाक दाखवत पळून गेला. आम्ही कुमार चव्हाण याला ताब्यात घेतले. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस