ग्रामीण रुग्णालयातही उपलब्ध होणार ‘सिरप’
By Admin | Updated: February 24, 2015 23:10 IST2015-02-24T23:10:36+5:302015-02-24T23:10:36+5:30
नवीन वर्षात आतापर्यंत जिल्ह्यात स्वाइन फ्लूने सहा जणांचा बळी घेतला असून, जिल्हा प्रशासन अलर्ट झाले आहे. जिल्ह्यात टॅमी फ्लूचा

ग्रामीण रुग्णालयातही उपलब्ध होणार ‘सिरप’
पुणे : नवीन वर्षात आतापर्यंत जिल्ह्यात स्वाइन फ्लूने सहा जणांचा बळी घेतला असून, जिल्हा प्रशासन अलर्ट झाले आहे. जिल्ह्यात टॅमी फ्लूचा आवश्यक साठा असून, लहान मुलांसाठी ‘सिरप’ उपलब्ध करून देऊ, असे जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. एन. डी. देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांनी देशमुख यांच्याकडून स्वाइन फ्लूबाबतच्या उपाययोजनांची माहिती घेऊन आवश्यक उपाययोजना तातडीने करा, अशा सूचना आज दिल्या. त्यानुसार हे सायरस सिरप उपलब्ध करून देण्याचे देशमुख यांनी सांगितले. खासगी संस्थेकडून हे सिरप विकत घेणार असून साधारण २०० बाटल्या पहिल्या टप्प्यात घेणार असल्याचे ते म्हणाले.
यामुळे जिल्हा प्रशासन
सतर्क झाले आहे. जिल्ह्यात काही प्रतिबंधक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. यात जिल्हास्तरावर वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहायक, प्राथमिक आरोग्य केंद्र यांचे प्रशिक्षण सुरू आहे. तालुकास्तरावर सर्व आरोग्य कर्मचारी व खासगी वैद्यकीय व्यावसायिकांचेही प्रशिक्षण घेतले जात आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर केलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यात ४९९६ ताप, सर्दी व खोकलासदृश रुग्णांची तपासणी करण्यात आल्याचे आरोग्य प्रशासनाने सांगितले. जिल्हा परिषदेशी संबंधित तालुक्यातील सर्व विभागांत कार्यशाळा घेतल्या जाणार असून तेथे दक्षतेबाबात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यामध्ये जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा, अंगणवाड्या व आशांना याबाबत माहिती दिली जाणार आहे. यामुळे स्वाइन फ्लूबाबत घ्यावयाच्या काळजीबाबात दुर्गम भागात माहिती पोहोचविली जाणार आहे.
पुढील दोन दिवसांत जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्षांच्या उपस्थितीत एक आढावा बैठकही घेतली जाणार आहे. यामध्ये जिल्हा आरोग्य विभागत उपाययोजनांबाबत सविस्तर माहिती देणार आहे. (प्रतिनिधी)