शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर रात्रीच हल्ला? नेतन्याहू यांच्या विमानाचं हवेत उड्डाण; ५० ठिकाणं अमेरिकेच्या हिटलिस्टवर
2
इराण-अमेरिका युद्धाची शक्यता? तेहरानच्या इशाऱ्यानंतर कतारमधील अमेरिकन हवाई तळ केले रिकामे
3
ट्रम्प यांच्या टॅरिफवर आज कोणताही निर्णय नाही, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी दुसऱ्यांदा पुढे ढकलली
4
Daryl Mitchell च्या शतकासह यंगची 'विल पॉवर'! टीम इंडियावर पलटवार करत न्यूझीलंडनं साधला बरोबरीचा डाव
5
Daryl Mitchell Hundred : डॅरिल मिचेलची कडक सेंच्युरी; किंग कोहलीच 'नंबर वन' स्थान धोक्यात!
6
अमेरिकेने केली इराणची कोंडी, चारही बाजूंनी घेरले; 'या' देशांमध्ये लष्करी तळ...
7
हजारीबागमध्ये भीषण बॉम्ब ब्लास्ट, तिघांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
8
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर आज रात्री फैसला; ट्रम्प यांच्याविरोधात निकाल गेल्यास काय घडू शकतं?
9
शिंदेंच्या उमेदवाराच्या घरावर मतदानाआधी दगडफेक; खिडक्या फोडल्या, खुर्च्या तोडल्या, प्रचंड राडा
10
मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय?
11
धक्कादायक ! नागपुरात बाप झाला सैतान,पत्नीकडे ताबा जाऊ नये म्हणून पोटच्या मुलीची हत्या
12
लहानपणीची गोंडस मुलगी आता झालीये सुपरहॉट, रेड बॅकलेस ड्रेसमध्ये सारा अर्जुनचा किलर लूक!
13
"JJD हा लालूंचा खरा पक्ष"; राजद विलीनीकरणावर तेजप्रताप यांची तेजस्वींना थेट ऑफर
14
Petrol कार्सच्या तुलनेत Diesel कार्स जास्त मायलेज का देतात? जाणून घ्या यामागील विज्ञान...
15
बांगलादेशचा आडमुठेपणा! भारतात टी-२० वर्ल्डकप खेळण्यास नकार; आता आयसीसीकडे आहेत ३ पर्याय!
16
IND vs NZ : हर्षित राणानं ऑफ स्टंप उडवत डेवॉन कॉन्वेचा केला करेक्ट कार्यक्रम! गंभीरने अशी दिली दाद
17
मुस्लिमबहुल प्रभागांत रंगणार काँग्रेस-एमआयएम सामना! १३ जागांसाठी काँग्रेसची धडपड, शिंदेसेना चारही जागा राखणार?
18
डोंबिवलीत भाजपा अन् शिंदेसेनेत जोरदार राडा; ५ जणांना अटक, जखमींवर रुग्णालयात उपचार
19
Video - ई-रिक्षातील तरुणाचं अश्लील कृत्य; रणरागिणीने रस्त्यावरच घडवली चांगलीच अद्दल
20
"विना परवाना शस्त्र वाटणार, ज्याला हवं त्याने..."; योगी सरकारच्या मंत्र्याचं धक्कादायक विधान
Daily Top 2Weekly Top 5

सिग्नल होणार सिंक्रोनाईज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 00:30 IST

शहरातील वाहतूककोंडीवर उपाय : स्मार्ट सिटीचा प्रकल्प

- विवेक भुसे 

पुणे : शहरातील वाढती वाहनांची संख्या.. त्यात प्रमुख रस्त्यावरील सिग्नल एकमेकांशी जोडलेले नसल्याने प्रत्येक चौकाचौकांत सिग्नलवर थांबावा लागणारा वेळ यामुळे वाहतूककोंडीत भर पडत आहे़ यावर उपाय म्हणून शहरातील प्रमुख रस्त्यांवरील सिग्नल सिंक्रोनाईज करण्याचा प्रकल्प स्मार्ट सिटीने आखला आहे़ यामुळे एका सिग्नलवरून वाहनचालक सुटला तर त्याला त्या रस्त्यावरील पुढील सिग्नल हिरवा मिळत जाईल व त्यातून वाहतूककोंंडी काही प्रमाणात कमी करण्यात यश येणार आहे़

मुंबईत एका सिग्नलवरून सुटल्यावर वाहनांना सलग ४ ते ५ किलोमीटर रस्त्यावरील सिग्नल हिरवा मिळतो़ त्यामुळे वाहनचालकांमध्ये थांबण्याची वेळ येत नाही़ परिणामी वाहतूककोंडी कमी होते़ मात्र, पुण्यात रस्त्यावरील दोन सिग्नल सिंक्रोनाईज नसल्याने वाहनचालकांना अनेकदा प्रत्येक सिग्नलला थांबावे लागते़ त्यातून वाहतूककोंडी वाढीस लागते़ त्याचबरोबर सिग्नल तोडण्याचे प्रमाणही वाढते़ 

शहरातील विविध रस्त्यांवर बसविण्यात आलेले सिग्नल हे वेगवेगळ्या काळात आणि वेगवेगळ्या पद्धतीचे बसविण्यात आले आहेत़ त्यामुळे महत्त्वाच्या रस्त्यावरील सिग्नल हे सिंक्रोनाईज करणे शक्य होत नाही़ त्यामुळे हे सिग्नल सिंक्रोनाईज करण्यासाठी एटीएमएस योजना स्मार्ट सिटीने आखली आहे़

याबाबत वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी सांगितले की, एटीएमएस योजनेत सुरुवातीला पाच रस्त्यांची निवड करण्यात आली आहे़ हे पाच रस्ते स्मार्ट सिटी व्यवस्थापन पाच कंपन्यांना देणार आहे़ त्यावरील सिग्नल व्यवस्था कशी असावी याविषयी निकष ठरविण्यात आले आहे़ ज्या कंपनीला सर्वाधिक गुण मिळतील, त्यांना इतर रस्त्यावरील सिग्नल सिंक्रोनाईज करण्याचे काम दिले जाणार आहे़ या प्रकल्पामुळे ज्या दिशेला अधिक वाहने त्यांना योग्य वेळ दिला जाईल़ ही योजना येत्या दीड वर्षात पूर्ण होईल़सिग्नल तोडण्याचे प्रमाण कमी होणार : एकापाठोपाठ सिग्नल मिळाल्याने वेळेची बचत४हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर एकाच दिशेने जाणाऱ्या वाहनांना एकापाठोपाठ सिग्नल मिळत गेल्याने वाहनचालकांच्या प्रवासाच्या वेळेत बचत होईल व त्याचबरोबर एक सिग्नल तोडला तरी पुढच्या सिग्नलला थांबावे लागणार असल्याचे वाहनचालकांच्या लक्षात आल्यावर सिग्नल तोडण्याचे प्रमाण कमी होणार आहे़आज सिग्नलचे टाइम योग्य नसल्याने अनेकदा वाहनचालकांना प्रत्येक सिग्नलला थांबावे लागते़ या प्रकल्पामुळे वाहनचालकांना योग्य वेळेत सिग्नल मिळेल़ रियल टाइम सिग्नलमुळे वाहतूककोंडी कमी होण्यास मदत होणार आहे़- तेजस्वी सातपुते,पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा़चतु:शृंगी मंदिर ते प्रभात रोड जंक्शन : शिवाजी हौसिंग चौक, वेताळबाबा चौक, पत्रकारनगर जंक्शन चौक, भांडारकर रोड जंक्शन चौक, प्रभात रोड जंक्शन चौक़अलका चौक ते नाथ पै चौक (शास्त्री रोड) : अलका चौक (टिळक चौक), विसावा मारुती चौक, शामराव गांजवे चौक, सेनादत्त पोलीस चौकी चौक, नाथ पै चौक़गुंजन चौक ते विमाननगर : गुंजन चौक, शास्त्रीनगर चौक, कल्याणीनगर चौक, वडगावशेरी चौक, विमाननगर चौक़आंबेडकर चौक ते बोल्हाई चौक : दोराबजी चौक, नेहरू मेमोरियल चौक, बॅनर्जी चौक, बोल्हाई चौक़संचेती चौक ते अलका टॉकिज चौक : संचेती चौक, झाशी राणी चौक, नटराज चौक, खंडोजीबाबा चौक, अलका टॉकिज चौक (टिळक चौक)़