हरगुडेतील तरुणावर तलवारीने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:13 IST2021-08-26T04:13:09+5:302021-08-26T04:13:09+5:30

किरण युवराज ताकवले (वय ३५) यांनी तीन तरुणांविरोधात सासवड पोलीस स्टेशन येथे तक्रार करण्यात आली आहे. किरण ताकवले हे ...

Sword attack on a young man from Hargude | हरगुडेतील तरुणावर तलवारीने वार

हरगुडेतील तरुणावर तलवारीने वार

किरण युवराज ताकवले (वय ३५) यांनी तीन तरुणांविरोधात सासवड पोलीस स्टेशन येथे तक्रार करण्यात आली आहे. किरण ताकवले हे मित्रांसमवेत हॉटेल समोर बसले असताना आरोपी साई ताकवले, योगेश ताकवले (दोघे सध्या राहाणार भेकराईनगर, हडपसर) व नितीन प्रदीप ताकवले (राहाणार हरगुडे) लाल रंगाची चारचाकी गाडी (एमएच ०७ क्यू ८२४७) मधून आले. शिवीगाळ दमदाटी करून साई महादेव ताकवले याने तलवारीने तीन वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सदर घटना ही पूर्ववैमनस्यातून घडली असल्याचे सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत माळी पुढील तपास करीत असून आरोपींना लवकरच ताब्यात घेणार असल्याचे आण्णासाहेब घोलप यांनी सांगितले.

Web Title: Sword attack on a young man from Hargude