‘स्वाइन’चा पहिला बळी!

By Admin | Updated: January 9, 2017 02:28 IST2017-01-09T02:28:13+5:302017-01-09T02:28:13+5:30

नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच स्वाइन फ्लू आजाराने राज्यातील पहिला बळी गेला आहे. लोणी काळभोर येथील ३६ वर्षांच्या तरुणाला मागील

Swine's first victim | ‘स्वाइन’चा पहिला बळी!

‘स्वाइन’चा पहिला बळी!

पुणे : नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच स्वाइन फ्लू आजाराने राज्यातील पहिला बळी गेला आहे. लोणी काळभोर येथील ३६ वर्षांच्या तरुणाला मागील आठवड्यात पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिक येथे दाखल करण्यात आले होते.
या रुग्णाला मागील
६ महिन्यांपासून मधुमेह आणि किडणी स्टोनचा जुना आजार होता. त्यासंदर्भात त्यावर उपचार सुरू होते. रुग्णाला श्वसनाचा त्रास होऊ लागल्यांनतर त्याला शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी ३१ डिसेंबरला दाखल करण्यात आले होते. तेथे त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्याला स्वाइन फ्लू असल्याचा संशय असल्याने रुग्णाचे घशाचे द्रव (स्वॅब) ची तपासणीसाठी ३१ डिसेंबरला रुग्णालयाच्या लॅबमध्ये पाठवण्यात आले होेते. दोन जानेवारीला त्याला स्वाइन फ्लू झाल्याचे निदान करण्यात आले. यानंतर रूग्णाला व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. दरम्यान रुग्णाला न्यूमोनिया आणि तीव्र श्वसनाचा विकार जडला व त्याची तब्येत खालावत गेली. तसेच त्याच्या मूत्रपिंडालाही सूज आली होती. रविवारी पहाटे साडेपाच वाजता त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. राज्यातील पहिलाच बळी पुण्यात गेल्याने येत्या काळात काळजी घेणे आवश्यक असल्याचे चित्र आहे.
याविषयी राज्याच्या आरोग्य विभागाच्या सहसंचालक डॉ. कांचन जगताप म्हणाल्या, की आज झालेल्या मृत्यूबाबत अजून माहिती नाही. मागील वर्षी राज्यभरात ८० जणांना या आजाराची लागण झाली असून,
२५ जणांचा मृत्यू झाला असल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Swine's first victim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.