पुणे : सांगवी सांडस (ता. हवेली) येथील एका महिलेचा स्वाइन फ्लूने मंगळवारी पुण्यात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. नवीन वर्षात आतापर्यंत जिल्ह्यात स्वाइन फ्लूने २३ जणांचा बळी घेतला आहे. मार्च महिन्यात १४ जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत ९६ जणांना लागण झाली आहे. हवेली तालुक्यात सर्वाधिक ४२ रूग्ण सापडले असून ६ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर बारामती तालुक्यातील ४ जणांचा , जुन्नर खेडमध्ये प्रत्येकी ३ तर इंदापरू, पुरंदरमध्ये दोन तर वेल्हे, मावळ व आंबेगावत प्रत्येकी १ जणांचा मृत्यू झाला आहे. उन्हाचा पारा चढत असल्याने अटकाव येईल असे बोलले जात आहे. मात्र मृत्यूचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. मृतांमध्ये १३ पुरुषांचा व ९ महिलांचा समावेश आहे. १५ ते ५० वयोगटातील १८ जणांचा मृत्यू झाला आहे. ५0 च्यापुढील ४ जणांचा समावेश आहे. ससूनमध्ये ४, रुबीमध्ये ३ , नोबलमध्ये ६, पूना हॉस्पिटल ३ , के.ई.एम १, राव १, स्टार १, वायसीएम २ , आदित्य बिर्लामध्ये १ रुग्णांचा उपचार घेताना मृत्यू झाला. जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीन सर्व आरोग्य केंद्रांवर टॅमिफ्लूच्या गोळ्या उपलब्ध करून दिल्या आहेत. आजाराची लक्षणे आढळल्यास डॉक्टरांशी संपर्क साधण्याचे आवाहन वाडेबोल्हाई केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन वाडेकर यांनी केले आहे. (प्रतिनिधी)गेल्या तीन महिन्यांपासून शहरात सुरू असलेली स्वाइन फ्लूची साथ वाढत्या तापमानामुळे आटोक्यात येत असतानाच, दुसरीकडे या वाढत्या उकाडयामुळे शहरात पुन्हा डेंगूच्या साथीने डोके वर काढण्याची धास्ती आरोग्य विभागाने घेतली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेकडून पाण्याची डबकी साचलेल्या ठिकाणी औषध फवारणी करण्याचे काम हाती घेण्यात आले. गेली १५ दिवस पुण्यातील खासगी रुग्णालयामध्ये त्या महिलेवर उपचार सुरू होते. सर्दी, खोकला, ताप अशी आजारपणाची लक्षणे जाणवू लागल्याने त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. चाचणीत महिलेस स्वाइन फ्लूची बाधा झाल्याने उपचार सुरू होते.टॅमीफ्लूचा मुबलक साठाटॅमीफ्लू ७५ एमजी- २२९५टॅमीफ्लू ४५ एमजी- ४३७0टॅमीफ्लू ३0 एमजी- ४00एसवायपी टॅमीफ्लू ७५ एमएल- ५आॅर्डिनरी मास्क - २३३४७0अवकाळी पावसाने अनेक ठिकाणी पाण्याची डबकी साठलेली आहेत. या डबक्यांमध्ये डेंगूच्या डासांची उत्पत्ती मोठया प्रमाणावर होण्याची भिती आहे. डबकी शोधून औषध फवारणी करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे महापालिकेचे प्रभारी आरोग्य प्रमुख डॉ. एस.टी परदेशी यांनी सांगितले.
स्वाइनने घेतले जिल्ह्यात २३ जणांचे बळी
By admin | Updated: March 25, 2015 23:25 IST