शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

नीरेत स्वाइन फ्लूचे संशयित रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2018 02:05 IST

पुरंदर तालुक्यात तीन रुग्ण पॉझिटिव्ह; आरोग्य विभाग संथच

नीरा : येथे स्वाइन फ्लूचे संशयित रुग्ण आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच गेल्या पंधरा-वीस दिवसांपासून नीरा व परिसरात वातावरणातील बदलामुळे दिवसेंदिवस व्हायरल इन्फेक्शन झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. यावर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.नीरा व परिसरात खोकला, सर्दी, ताप यांसारखे व्हायरल इन्फेक्शन झालेल्या रुग्णांची संख्या वाढल्याने खासगी दवाखाने व सरकारी दवाखान्यांमध्ये रुग्णांची वाढती संख्या आहे. तसेच ग्रामीण भागातील नीरासारख्या गावातही स्वाईन फ्लूचे संशयित रुग्ण आढळून आले आहेत. राज्यातील पुणे, नाशिक यांसारख्या मोठ्या शहरांत स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळत असून, ग्रामीण भागातही स्वाइन फ्लूने आपले रौद्ररूप दाखविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य विभागाच्या यंत्रणेने तातडीने उपाययोजना करून नागरिकांना दिलासा देणे गरजेचे आहे.दरम्यान, शासन सर्वसामान्य नागरिकांना चांगली आरोग्य सुविधा मिळण्यासाठी प्रयत्न करीत आहे. परंतु नीरा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून नीरा गावात व्हायरल इन्फेक्शनच्या साथीवर नियंत्रण व जनजागृती करण्याकरिता उपाययोजना केली जात नसल्याचे व वैद्यकीय अधिकारी वेळेवर हजर राहत नसून अतितातडीच्या रुग्णांना तातडीने उपचार करण्यास विलंब होत असल्याच्या तक्रारी रुग्ण करीत आहेत. जिल्हा आरोग्य अधिकाºयांनी नीरा आरोग्य केंद्राच्या कारभाराकडे लक्ष द्यावे अशी मागणी नागरिक करीत आहेत.पुरंदर तालुक्यात आतापर्यंत तीन रुग्णांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचा अहवाल आहे. नीरा, माळशिरस, वाघापूर, पिंपरे या गावांतून स्वाइन फ्लूसदृश आजाराचे रुग्ण आढळले आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रात या संदर्भात लागणारी औषधे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. लोकांनी तिथे उपचार घ्यावेत. तसेच गावातून सर्व्हे करण्यात येत आहे. संशयित रुग्ण आढळल्यास उपचार करण्यात येत आहेत. आजाराबाबत जागृती करणारी पत्रकेही वाटण्यात येत आहेत. लोकांनी घाबरून न जाता उपचार करून घ्यावेत. प्रत्येकाने वैयक्तिक स्वच्छता ठेवावी. आवश्यकता नसेल तेव्हा गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. नीरा प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी आणखी एक वैद्यकीय अधिकारी देण्यात येईल.- अभय तिडके, तालुका वैद्यकीय अधिकारीनीरा गावात पाळीव डुकरे मोकाट फिरत असतात. त्यामुळे अनेक प्रकारच्या आजारांचे विषाणू पसरतात. विषाणूंमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असतानाच स्वाइन फ्लूचे संशयित रुग्ण आढळू लागल्याने नागरिक हैराण झाले आहेत. याकडे प्रशासन लक्ष देत नसल्याने नागरिक नाराज झाले आहेत.पाळीव डुकरे व भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. ग्रामपंचायत प्रशासन मात्र याबाबत कोणतीही कारवाई करीत नाही.

टॅग्स :Swine Flueस्वाईन फ्लूHealthआरोग्यPuneपुणे