शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

स्वाईन फ्लु प्रतिबंधक लस सव्वा लाख जणांना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2018 21:38 IST

मागील काही महिन्यांत पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिकसह राज्यात अनेक भागात स्वाईन फ्लुचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून आले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधक लस दिली जात आहे.

ठळक मुद्देस्वाईन फ्लुची लागण झालेल्या रुग्णांमध्ये या व्यक्तींचा समावेश अधिक या लसीमुळे स्वाईन फ्लुचा धोका टळतो१ जानेवारी ते १९ आॅक्टोबर या कालावधीत सुमारे १ लाख २८ हजार व्यक्तींना ही लस राज्यात स्वाईन फ्लुवरील आॅसेलटॅमीवीर औषधे आणि इतर साधनसामुग्री पुरेशा प्रमाणात उपलब्धराज्यात दि. १९ आॅक्टोबरअखेरपर्यंत स्वाईन फ्लुने २६२ जणांचा मृत्यू

पुणे : स्वाईन फ्लुला प्रतिबंध करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने अतिजोखमीच्या व्यक्तींना लस दिली जाते. यावर्षी दि. १ जानेवारी ते १९ आॅक्टोबर या कालावधीत सुमारे १ लाख २८ हजार व्यक्तींना ही लस देण्यात आली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत हा आकडा जवळपास तिप्पट आहे. गर्भवती महिला, मधुमेह आणि उच्चरक्तदाब असणाऱ्या व्यक्तींसह स्वाईन फ्लुच्या रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश अतिजोखमीच्या व्यक्तींमध्य होतो. त्यामुळे राज्य शासनाच्या वतीने त्यांना स्वाईन फ्लुची लस मोफत दिली जाते. या लसीमुळे स्वाईन फ्लुचा धोका टळतो. स्वाईन फ्लुची लागण झालेल्या रुग्णांमध्ये या व्यक्तींचा समावेश अधिक आहे. आरोग्य विभागाकडून २०१५-१६ मध्ये १ लाख १ हजार ३५६ अतिजोखमीच्या व्यक्तींना ही लस देण्यात आली होती. तर दि. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर या कालावधीत ४२ हजार ४९२ जणांचे लसीकरण करण्यात आले. मागील काही महिन्यांत पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिकसह राज्यात अनेक भागात स्वाईन फ्लुचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून आले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधक लस दिली जात आहे. त्यामुळे दि. १ जानेवारी ते दि. १९ आॅक्टोबर अखेरपर्यंत १ लाख २८ हजार २६ जणांना लस देण्यात आली आहे. ही लस मोफत आणि ऐच्छिक असून यापुढील काळातही संबंधितांना दिली जाणार आहे. दरम्यान, राज्यात स्वाईन फ्लुवरील आॅसेलटॅमीवीर औषधे आणि इतर साधनसामुग्री पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. स्वाईन फ्लुवर नियंत्रण आणण्यासाठी विविध उपाययोजनाही केल्या जात आहेत, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.-------------राज्यात २६२ जणांचा मृत्यूमागील काही दिवसांपासून स्वाईन फ्लुच्या रुग्णांची संख्या कमी होत चालल्याचे आरोग्य विभागातील अधिकाºयांनी सांगितले. राज्यात दि. १९ आॅक्टोबरअखेरपर्यंत स्वाईन फ्लुने २६२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २ हजार ९६ रुग्णांना स्वाईन फ्लुची लागण झाली. त्यामध्ये पुणे, पिंपरी चिंचवड व नाशिकमधील रुग्णांचा समावेश आहे.    

टॅग्स :PuneपुणेSwine Flueस्वाईन फ्लूGovernmentसरकार