शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात स्वाइन फ्लूचा पुन्हा उद्रेक, आठ दिवसांत २६ बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2018 04:14 IST

राज्यात स्वाइन फ्लूने डोके वर काढले असून मृतांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे.

पुणे : राज्यात स्वाइन फ्लूने डोके वर काढले असून मृतांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. शनिवारपर्यंत राज्यात ८२ जणांचा बळी गेला आहे. त्यामध्ये पुणे व नाशिक जिल्ह्यातील रुग्ण अधिक आहेत. रविवारी गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे गर्दी होईल, त्यामुळे स्वाइन फ्लूची लक्षणे असलेल्या नागरिकांनी बाहेर जाणे टाळावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.जुलैपासून बाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. १४ सप्टेंबरपर्यंत राज्यात ५६ जणांचा मृत्यू झाला होता. मागील आठ दिवसांतच आणखी २६ जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा ८२ वर पोहोचला आहे. राज्यातील विविध रुग्णालयांमधील उपचार घेत असलेल्या तसेच व्हेंटिलेटरवरील रुग्णांची संख्या जास्त आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नाशिकमध्ये २६ तर पुणे जिल्ह्यात २८ जणांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला आहे. निम्म्यापेक्षा जास्त मृत्यू या दोन जिल्ह्यांतच झाले आहे. नाशकात तर १ हजार ९४९ रुग्णांना स्वाइन फ्लूची लागण झाली होती. ३३५ अतिगंभीर रुग्णांपैकी २६ जणांना प्राण गमवावे लागले. जळगाव जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांत स्वाइन फ्लूच्या दोन संशयित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नगर जिल्ह्यात सप्टेंबरमध्ये ११ जणांचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात प्रत्येकी ९ तर सातारा जिल्ह्यात ७ जणांचा बळी गेला आहे.विसर्जन मिरवणुकीत काळजी घ्यागणेश विसर्जनामुळे रविवारी सर्वत्र मोठी गर्दी होणार आहे. त्यामुळे सर्दी, ताप अशी स्वाइन फ्लूची लक्षणे असलेल्या नागरिकांनी घरीच थांबावे, असे आवाहन डॉ. प्रदीप आवटे यांनी केले.

टॅग्स :Swine Flueस्वाईन फ्लूMaharashtraमहाराष्ट्र