स्वाइन फ्लूने ज्येष्ठ महिलेसह दोघांचा मृत्यू
By Admin | Updated: March 2, 2015 03:27 IST2015-03-02T03:27:25+5:302015-03-02T03:27:25+5:30
पुण्यातील स्वाइन फ्लूचा धोका आणखी वाढला असून, आणखी तिघांचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला. यातील अहमदाबादमधील एका

स्वाइन फ्लूने ज्येष्ठ महिलेसह दोघांचा मृत्यू
पुणे : पुण्यातील स्वाइन फ्लूचा धोका आणखी वाढला असून, आणखी तिघांचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला. यातील अहमदाबादमधील एका ज्येष्ठ महिलेचा समावेश आहे. यामुळे बळींची संख्या ३१ वर पोहोचली आहे. दरम्यान, आज दिवसभरात स्वाइन फ्लूची लागण झालेले १९ नवे रुग्ण सापडले आहेत आणि लागण झालेल्या २६ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
अहमदाबादमधील साबरमती येथे राहणाऱ्या ५८ वर्षीय महिलेचा खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्याबरोबर शुक्रवार पेठेत राहणाऱ्या ५१ वर्षीय आणि विमानगरमध्ये राहणाऱ्या ५० वर्षीय व्यक्तीचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या तिघांनी उपचारास स्वत:हून उशीर केल्याची नोंद पुणे महापालिकेने अहवालात केली आहे.
पालिकेने आजही स्वाइन फ्लूच्या तपासणीसाठी दवाखाने उघडे ठेवले होते. त्यामुळे दिवसभरात २ हजार ५२५ जणांची स्वाइन फ्लूची तपासणी केली. त्यापैकी ८८ संशयितांना टॅमीफ्लू औषधे देण्यात आली आणि ४२ जणांच्या घशातील कफाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. ९६ रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.