स्वाइन फ्लूने महिलेचा मृत्यू ; एकाची प्रकृती चिंताजनक
By Admin | Updated: January 10, 2015 22:56 IST2015-01-10T22:56:26+5:302015-01-10T22:56:26+5:30
स्वाइन फ्लूचे रुग्ण पुन्हा शहरात सापडू लागले आहेत. स्वाइन फ्लूमुळे शुक्रवारी (दि. ९) एका महिलेचा मृत्यू झाला. या वर्षातील हा दुसरा मृत्यू आहे.

स्वाइन फ्लूने महिलेचा मृत्यू ; एकाची प्रकृती चिंताजनक
पुणे : स्वाइन फ्लूचे रुग्ण पुन्हा शहरात सापडू लागले आहेत. स्वाइन फ्लूमुळे शुक्रवारी (दि. ९) एका महिलेचा मृत्यू झाला. या वर्षातील हा दुसरा मृत्यू आहे. याबरोबर स्वाइन फ्लूची लागण झालेल्या एका व्यक्तीची प्रकृती चिंताजनक असून त्याला व्हेंटिलेटवर ठेवण्यात
आले आहे. मार्गरेट रॉड्रीक्स (वय ५०, रा. वानवडी) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ७ जानेवारीला त्यांच्या घशातील नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. ९ जानेवारीला आलेल्या तपासणी अहवालात त्यांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते.
शनिवारी दिवसभरात २४६ जणांची स्वाइन फ्लूची तपासणी करण्यात आली. यापैकी १९ संशयितांना टॅमीफ्लू औषधे देण्यात आली आहेत.