स्वाइन फ्लूने वृद्धेसह एकाचा मृत्यू
By Admin | Updated: March 12, 2015 06:17 IST2015-03-12T06:17:20+5:302015-03-12T06:17:20+5:30
शहरामध्ये स्वाइन फ्लूच्या बळीचे सत्र सुरूच आहे. बुधवारी आणखी एकाचा बळी गेला आहे. तसेच मंगळवारी मृत झालेल्या उत्तम आडसूळ यांनाही

स्वाइन फ्लूने वृद्धेसह एकाचा मृत्यू
पिंपरी : शहरामध्ये स्वाइन फ्लूच्या बळीचे सत्र सुरूच आहे. बुधवारी आणखी एकाचा बळी गेला आहे. तसेच मंगळवारी मृत झालेल्या उत्तम आडसूळ यांनाही स्वाइन फ्लू झाल्याचे अहवालातून निष्पन्न झाले आहे.
कीर्ती जहागिरदार (वय ६८, रा. शाहूनगर) असे मृताचे नाव आहे. त्यांच्यावर निगडी प्राधिकरणातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना २ मार्चला रुग्णालयात दाखल केले होते. प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालात त्यांना स्वाइन फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यांचा बुधवारी सकाळी ९ ला मृत्यू झाला. महापालिकेतील कर्मचारी आडसूळ यांचा अहवाल बुधवारी मिळाला. त्यात त्यांना स्वाइन फ्लू झाल्याचे स्पष्ट झाले. आत्तापर्यंत या आजारामुळे १८ जणांचा मृत्यू
झाला आहे. संशयित रुग्णांवर शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (प्रतिनिधी)