तीन लाखांहून अधिक किमतीची मिठाई जप्त

By Admin | Updated: November 9, 2015 01:57 IST2015-11-09T01:57:44+5:302015-11-09T01:57:44+5:30

अहमदाबाद येथून खासगी बसने आलेली मिठाई अन्न व औषध प्रशासनाकडून नुकतीच जप्त करण्यात आली. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरातील एसटी स्टँड, रेल्वे स्थानकांवर विशेष

Sweets worth more than three lakhs were seized | तीन लाखांहून अधिक किमतीची मिठाई जप्त

तीन लाखांहून अधिक किमतीची मिठाई जप्त

पुणे : अहमदाबाद येथून खासगी बसने आलेली मिठाई अन्न व औषध प्रशासनाकडून नुकतीच जप्त करण्यात आली. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरातील एसटी स्टँड, रेल्वे स्थानकांवर विशेष कार्यवाही केली जात असून त्याअंतर्गत ही कारवाई केल्याचे सहायक आयुक्त दिलीप संगत यांनी सांगितले.
यामध्ये ५९८ किलोचा ६०८०० रुपयांचा कलाकंद, तर १३ हजार ६१ किलोची ३ लाख ४० हजार ५०० रुपयांची स्पेशल बर्फी ताब्यात घेण्यात आली.
दिवाळीच्यादरम्यान शहरात मोठ्या प्रमाणात मिठाई तयार होतेच; त्याशिवाय बाहेरगावाहूनही मिठाई अशा प्रकारे शहरात आणली जाते. परंतु प्रवासादरम्यान ती खराब होण्याची किंवा बनवितानाच त्यामध्ये भेसळ होण्याची शक्यता असल्याने कारवाई करण्यात येत आहे. याआधीही एसटी स्टँडवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली असून विक्रेत्यांनीही विशेष काळजी घ्यावी, असे सांगण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Sweets worth more than three lakhs were seized