शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

‘शिवभोजन’च्या लाभार्थ्यांना मिष्टान्नाचा लाभ;नेत्यांचे वाढदिवस, संस्थांकडून स्पॉन्सरशिप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2020 20:14 IST

शहरामध्ये नव्याने पाच केंद्र सुरु होणार

ठळक मुद्देप्रत्येक जिल्ह्यात शहराच्या ठिकाणी प्रायोगिक तत्वावर शिवभोजन केंद्र सुरु

पुणे : शहरामध्ये शासनाच्या ' शिवभोजन ' थाळीला चांगला प्रतिसाद मिळत असून, नागरिकांची वाढती मागणी लक्षात घेऊन शासनाने पुणे शहराचा कोटा तब्बल ३ हजार थाळ्यांनी वाढविला आहे. यामुळे लवकरच शहरामध्ये नव्याने आणखी पाच केंद्रे सुरु करण्यात येणार असून, सध्या सुरु असलेल्या केंद्रांना प्रत्येकी ५० थाळ्या वाढवून देण्यात येणार असल्याची माहिती शहर अन्न धान्य वितरण अधिकारी अस्मिता मोरे यांनी सांगितले.     दरम्यान गरीब व सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या अनुदानावर केवळ दहा रुपयांमध्ये मर्यादित स्वरुपात हे शिवभोजन दिले जाते. परंतु शहरामध्ये अनेक केंद्रांवर आता शिवभोजनच्या लाभार्थ्यांना अधून-मधून मिष्टान्नाचा लाभ मिळू लागला आहे. परिसरातील राजकीय नेत्यांचे वाढदिवसा निमित्त अथवा काही सामाजिक संस्थांकडून शिवभोजनच्या लाभार्थ्यांना गोड पदार्थ अथवा जास्तीच्या अन्नासाठी स्पॉन्सरशिप दिली जात आहे. महा विकास आघाडी सरकारने राज्यात पहिल्या टप्प्यात प्रत्येक जिल्ह्यात शहराच्या ठिकाणी प्रायोगिक तत्वावर शिवभोजन केंद्र सुरु करण्यात आले आहे. यामध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये ११ ठिकाणी हे केंद्र सुरु करण्यात आली असून, दररोज केवळ १५०० लाभार्थ्यांना शिवभोजन थाळीचे वाटप करण्यात येते. परंतु बहुतेक सर्व ठिकाणी दररोज शेकडो लाभार्थी दिवसांचा कोटा पूर्ण झाल्याने मागे फिरून जातात. याबाबत मोरे यांनी  सांगितले की, शासनाच्या शिवभोजन थाळीला सर्वच ठिकाणी चांगली मागणी आहे. याबाबत शासनाला प्रस्ताव पाठविल्यानंतर पुणे शहरासाठी जास्तीच्या ३ हजार थाळींचा कोटा मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये २ हजार पुणे महापालिका हद्दीत तर १ हजार पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत या थाळ््या देण्यात येणार आहे. नव्याने ५ केंद्रे आणखी सुरु करण्यात येणार आहेत. यामध्ये मार्केट यार्ड, स्वारगेट, महापालिका भवन आणि बुधवार पेठ येथे नव्याने आणखी एक-एक केंद्रे सुरु करण्यात येणार आहेत. मार्केट यार्डात दररोज ४०० ते ४५० शिवभोजन थाळीची मागणी आहे. 

टॅग्स :Puneपुणेshiv bhojnalayaशिवभोजनालयState Governmentराज्य सरकार