स्वेटरखरेदी वादाच्या भोव:यात!

By Admin | Updated: December 12, 2014 00:03 IST2014-12-12T00:03:52+5:302014-12-12T00:03:52+5:30

खुल्या बाजारात स्वेटर अडीचशे ते तीनशे रुपयांना उपलब्ध असतानाही शिक्षण मंडळाकडून निविदा मागवून तब्बल 43क् रुपयांना स्वेटर खरेदी करण्याचा घाट शिक्षण मंडळाने घातला आहे.

Sweater buzz: In it! | स्वेटरखरेदी वादाच्या भोव:यात!

स्वेटरखरेदी वादाच्या भोव:यात!

पुणो : खुल्या बाजारात  स्वेटर अडीचशे ते तीनशे रुपयांना उपलब्ध असतानाही शिक्षण मंडळाकडून निविदा मागवून तब्बल 43क् रुपयांना स्वेटर खरेदी करण्याचा घाट शिक्षण मंडळाने घातला आहे. त्यामुळे 5क् हजार मुलांसाठी स्वेटर खरेदी करणा:या मंडळास तब्बल 67 लाख रुपयांचा फटका बसणार असल्याचे पुढे आले आहे. ही खरेदी थांबवून पुन्हा नव्याने स्वेटरखरेदी करावी, अशी मागणी सजग नागरिक मंचाने महापालिका आयुक्तांकडे केली आहे. दरम्यान, ही खरेदी शिक्षण मंडळाने जानेवारी 2क्14 मध्ये सुरू केली होती. मात्र, थंडी सुरू होऊनही ती केवळ निविदा प्रक्रियेवरच असल्याने थंडी संपल्यावर मंडळ स्वेटर देणार का, असा सवालही उपस्थित केला जात आहे.
पालिकेच्या शाळांतील सातवीर्पयतच्या  विद्याथ्र्याना स्वेटर देण्यात येणार आहेत. त्यासाठीची निविदा प्रक्रिया जानेवारी 2क्14 मध्ये सुरू करण्यात आली. मात्र, त्यानंतर नोव्हेंबर 2क्14 उलटला  तरी याबाबत हालचाल झालेली नाही. त्यानंतर आता लगबगीने आलेल्या निविदा मान्य करण्यासाठीचा प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे. मंडळाच्या निविदांनुसार, 394 रुपये 349 रुपये प्रतिस्वेटर दराने निविदा आलेल्या आहेत. परंतु प्रत्यक्षात खुल्या बाजारात त्याच प्रकारच्या स्वेटरची किंमत 267 ते 348 रुपये असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे एवढय़ा मोठय़ा प्रमाणात निविदेच्या दराने खरेदी केल्यास महापालिकेस 67 लाख रुपयांचा फटका बसणार आहे. त्यामुळे ही खरेदी रद्द करून खुल्या बाजातून दर मागवून स्वेटर घ्यावेत, अशी मागणी मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर, विश्वास सहस्रबुद्धे यांनी केली आहे. (प्रतिनिधी)
 
मागील पानावरून पुढे..
मागील वर्षी मुलांना थंडी संपल्यानंतर स्वेटर मिळाले होते. त्यामुळे या वर्षी वेळेत स्वेटर देण्यासाठी जानेवारी 2क्14 मध्येच खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र, डिसेंबर संपत आला असतानाही अद्याप निविदा प्रक्रियाच सुरू आहे. त्यामुळे मुलांना स्वेटर मिळण्यास काही महिन्यांचा अवधी लागणार आहे. त्यामुळे थंडी संपल्यावरच स्वेटर मिळणार असल्याने मागील पानावरून पुढे असेच चित्र दिसत आहे. 

 

Web Title: Sweater buzz: In it!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.