भजन स्पर्धेत स्वरांजाली व श्रीदत्त मंडळ प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:22 IST2021-09-02T04:22:45+5:302021-09-02T04:22:45+5:30
या स्पर्धेत ५६ भजनी मंडळानी भाग घेतला अत्यंत चुरशीच्या झालेल्या स्पर्धेत प्रथम क्रमांक - विभागून ...

भजन स्पर्धेत स्वरांजाली व श्रीदत्त मंडळ प्रथम
या स्पर्धेत ५६ भजनी मंडळानी भाग घेतला अत्यंत चुरशीच्या झालेल्या स्पर्धेत प्रथम क्रमांक - विभागून स्वरांजली भजनी मंडळ (अाव्हाळवाडी) व श्रीदत्त भजनी मंडळ (गुनाट) यांनी पटकावला. यावेळी राष्ट्रवादी हवेली तालुका अध्यक्ष दिलीप वाल्हेकर, महिला अध्यक्षा लोचन शिवले, माधुरी वाळके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार, आरोग्य अधिकारी सचिन खरात, रामदास खेडकर, योगेश शितोळे, सरपंच रुपेश गावडे, सागर तळेकर, विजय वाळुंज, राजेश वारघडे, संतोष गावडे आदी उपस्थित होते.
गारटकर पुढे म्हणाले, ही भजन स्पर्धा म्हणजे मनाची मशागत आहे. लोककला जोपासनाचे काम कौतुकस्पद आहे. समाजात कमी आहे तिथे आम्ही आहोत. समाज घडेल त्यातून राष्ट्र घडेल हे पक्षाचे धोरण आहे. या स्पर्धेत शिरूर-हवेली तालुक्यातील विविध गावांतील ५६ भजनी मंडळांनी सहभाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कोरोना महामारीमुळे दोन वर्षे पालखी सोहळा, अंखड हरिनाम सप्ताह बंद आहे. या परिस्थितीत स्पर्धेला चांगला गावा गावातून भजनी मंडळ सहभागी झाले. सर्वाच्या सहकार्याने उत्कृष्ट नियोजन करता आले. - प्रदीप कंद, संयोजक
वरिष्ठ सरचिटणिस राष्ट्रवादी पार्टी []
सविस्तर निकाल
प्रथम - ( विभागून) स्वरांजली भजनी मंडळ, आव्हाळवाडी व श्रीदत्त भजनी मंडळ गुनाट (२१०००/- रुपये व स्मृतिचिन्ह)
द्वितीय - (विभागून) सुखकर्ता महिला भजनी मंडळ, ताल विश्व भजनी मंडळ, (१५०००/- रुपये स्मृतिचिन्ह) तृतीय- (विभागून) स्वानंद भजनी वाघोली व कल्पवृक्ष महिला भजणी मंडळ , (११०००/- रुपये स्मृतिचिन्ह) उत्कृष्ट पखवाज वादक- सत्य अनुसया महिला बुर्केगाव उत्कृष्ट पेटीवादक- शाहीर प्रकाश बापू गोसावी, तबलावादक- गौरव शिपलकर
उत्कृष्ट तबला - गौरव शिपलकर, उत्तेजनार्थ संस्कृती भजनी, घनोबा भजनी मंडळ धानोरे, बहिणाबाई भजनी मंडळ पेरणे, बंकट स्वामी भजनी मंडळ लोणी कंद असे आहेत.
प्रारंभी संयोजक प्रदीप वसंत कंद यांनी स्वागत व प्रास्तविक, सूत्रसंचालन नवनाथ शिवले तर पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष विजय वाळुंज यांनी आभार मानले.
पेरणेफाटा (ता. हवेली) येथे आरंभ भजन स्पर्धेत स्वरांजली भजनी मंडळ, व श्रीदत्त भजनी मंडळ यांना राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले, यावेळी इतर मान्यवर.