शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

स्वामी आनंद यशवंत... ओशोंचे निस्सिम अनुयायी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2018 02:21 IST

मराठी भावसंगीत क्षेत्रात अवीट गोडीच्या गीतांची श्रृंखला सादर करणारे प्रतिभावंत संगीतकार आणि गीतकार अशी यशवंत देव यांची ओळख. पण ओशोंचे निस्सिम भक्त म्हणून त्यांचा एक वेगळा पैलू आहे, ज्याबददल फारसे कुणीच परिचित नाही....

पुणे : मराठी भावसंगीत क्षेत्रात अवीट गोडीच्या गीतांची श्रृंखला सादर करणारे प्रतिभावंत संगीतकार आणि गीतकार अशी यशवंत देव यांची ओळख. पण ओशोंचे निस्सिम भक्त म्हणून त्यांचा एक वेगळा पैलू आहे, ज्याबददल फारसे कुणीच परिचित नाही....ओशो आश्रमामध्ये ‘स्वामी आनंद यशवंत’ या नावाने ते ओळखले जायचे. त्यांचे हदय हे एका भक्ताचे होते. ज्या काळात ओशो यांचे नाव घ्यायलाही लोक घाबरायचे. मनात भाव असूनही सार्वजनिक ठिकाणी अनेकांना ओशोंबददल बोलण्यास धजावायचे नाही मात्र यशवंत देव हे जाहीर कार्यक्रमात ओशो यांचे नाव घेऊन त्यांचे भक्त असल्याचे सांगायचे....ओशो आश्रमाच्या प्रमुख मॉं अमृत साधना यशवंत देव नामक एका भक्ताचे ओशोंप्रती असलेले सात्विक प्रेम उलगडत होत्या.पुण्यातील ओशो आश्रमात यशवंत देव हे एखाद्या संन्यासारखे राहायचे. भगवे कपडे घालून, त्यांनी आश्रमात कार्यक्रमही केले आहेत. आमच्या उत्सवातही ते गायला यायचे. त्यांनी ओशो यांच्यावर ‘ओशो गये कहा है, ओशो अभी यहा है’, ’युग युग मैं तुमको फिर आना पडेगा’ अशा स्वरूपाच्या कविता त्यांनी रचल्या आहेत. ज्यावेळी ओशो अमेरिकेतून यायचे तेव्हा मुंबईमध्ये उतरून देव यांना प्रवचनातून गात जा, असे सांगायचे. ओशो यांच्यासमोर बसून त्यांचे भाव गाण्यापेक्षा ते स्वत:च ओशोंवर रचना लिहायचे. त्यांना ध्यानाची प्रचंड ओढ होती. ध्यानात भाव असेल तर बैठक पक्की होते. यासाट् तासनतास ते ध्यानाला बसायचे. हा प्रांजळपणा त्यांच्यात पाहायला मिळायचा. यश मिळालेल्या व्यक्तीमध्ये अनेकदा अहंकार पाहायला मिळतो पण त्यांच्या वागण्यामध्ये तो कधीच जाणवला नाही. ओशोंचे नाव घेताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू यायचे. देव यांच्या व्यक्तिमत्वाचे अजून एक वैशिष्ट म्हणजे त्यांची विनोदबुद्धधी. एका श्वासात गाणं तर दुस-या बाजूला प्रत्येक गोष्टीमध्ये कोटी करण्याची त्यांची मिस्किल शैली दिसायची. आम्ही त्यांना गुरूबंधू मानत होतो. अध्यात्म ही त्यांच्या जीवनाची मोठी ताकद होती. ध्यानामुळे आत्मबळ येते. यशवंत देव हे अत्यंत दुर्मिळ व्यक्तिमत्व होते. त्यांच्या निधनाने एक भाग गळून पडल्यासारखा झाला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.फार कमी कलाकार असे असतात जे कविता, गाण आणि शब्द सुरांच्या स्वभावाविषयी अचूक बोलू शकतात आणि सहजपणे लोकांपर्यंत पोहोचवू शकतात. त्यातील देवसाहेब एक होते. ख-या अर्थाने शब्दसुरांना आनंद देणे त्यांच्यामध्ये होते. त्या त्या वयात जाणे हे नैसर्गिक असले तरी त्या व्यक्तीच्या निधनाने अनेक माणस जाणे हे जास्त त्रासदायक आहे. उत्तम रसिक, शिक्षक आस्वादक निघून जाणे ही सांस्कृतिक समृद्धता कमी करणारे आहे. यशवंत देव यांच्या निधनाने भावगीत विश्वात पोकळी निर्माण झाली आहे. - सलील कुलकर्णी, संगीतकारयशवंत देव हे स्वरानंद प्रतिष्ठानचे मानद अध्यक्ष होते. संस्थेवर त्यांचे निस्सीम प्रेम होते. त्यांचा अमृतमहोत्सवी आणि ऐंशीवा वाढदिवस आम्ही साजरा केल्याने त्यांचं पुण्याशी नात जोडले गेले. अनेक कलाकारांना त्यांनी मार्गदर्शन केले. देव यांच्या अनेक कार्यशाळा स्वरानंद ने आयोजित केल्या होत्या. त्यांच्या निधनाने स्वरानंदचा आधारवडच कोसळला.- प्रकाश भोंडे, स्वरानंद प्रतिष्ठान

टॅग्स :Puneपुणे