स्वच्छ भारत अभियानाने वाढला कच:याचा ‘भार’

By Admin | Updated: November 28, 2014 00:44 IST2014-11-28T00:44:25+5:302014-11-28T00:44:25+5:30

केंद्र शासनाच्या ‘स्वच्छ भारत अभियाना’मुळे शहरात सर्वत्र स्वच्छता मोहीम सुरू आहे.

Swachh Bharat campaign boosted by: its 'weight' | स्वच्छ भारत अभियानाने वाढला कच:याचा ‘भार’

स्वच्छ भारत अभियानाने वाढला कच:याचा ‘भार’

पुणो : केंद्र शासनाच्या ‘स्वच्छ भारत अभियाना’मुळे शहरात सर्वत्र स्वच्छता मोहीम सुरू आहे. या अभियानामुळे शहरात  संकलित होणा:या कच:यात दरमहा हजार टन वाढ झाल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे या अभियानाची शहरात प्रभावीपणो अंमलबजावणी सुरू असल्याचे चित्र दिसून येते. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनानिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने ‘स्वच्छ भारत अभियान’ सुरू करण्यात आले आहे.
या मोहिमेअंतर्गत प्रत्येक नागरिक, संस्था तसेच लोकप्रतिनिधीने आठवडय़ातून दोन तास तसेच वर्षातून 1क्क् तास आपल्या परिसराच्या स्वच्छतेसाठी द्यावेत, असे आवाहन मोदी यांनी केले आहे. या मोहिमेत पालिकेनेही सक्रिय सहभाग घेतला आहे.  त्यानुसार, गेल्या महिनाभरात हे अभियान सक्रियपणो राबविण्याच्या सूचना पालिका आयुक्तांनी केल्या होत्या. त्यानुसार, पहिल्या व  तिस:या शुक्रवारी तसेच दुस:या व चौथ्या शनिवारी शहरात क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावर हे अभियान राबविण्यात येत आहे. तसेच, या अभियानात शहरातील शाळा, महाविद्यालये, खासगी अस्थापना आणि नागरिकही ग्रुपने सहभागी होत असल्याने संपूर्ण महिनाभर हा उपक्रम शहरात विविध ठिकाणी राबविला जात आहे. त्यामुळे शहरात संकलित करण्यात येणा:या कच:यात दरमहा एक हजार टन कच:याची वाढ झाल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. तसेच, या मोहिमेसाठी महापालिकेकडूनही कचरा संकलनासाठी विशेष सोय उपलब्ध करून दिले जात असल्याने कचरा संकलनातही वाढ झाली असल्याचे घनकचरा व्यस्थापन विभागाचे प्रमुख सुरेश जगताप यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
 
या अभियानांतर्गत नागरिकांकडून घरात तसेच घराच्या परिसरात  व खासगी अस्थापनांकडून आपला परिसर आणि कार्यालयांमध्ये स्वच्छता करण्यावरही भर दिला जात आहे. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून शहरातील कचराकुंडय़ा भरून वाहत असून, घरगुती तसेच कार्यालयीन सुक्या कच:याचे प्रमाण त्यात मोठय़ा प्रमाणात वाढले आहे. 
- सुरेश जगताप 
घनकचरा व्यवस्थापन विभागप्रमुख

 

Web Title: Swachh Bharat campaign boosted by: its 'weight'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.