शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

खडकवासला परिसरातील कुक्कुट पक्ष्यांचे स्वॅब, विष्ठा नमुना तपासणी सुरु, पशुसंवर्धन विभागाची कार्यवाही

By नितीन चौधरी | Updated: February 21, 2025 18:58 IST

या आजारास कारणीभूत घटकांमध्ये कुक्कुट पक्ष्याचा समावेश असल्याची तसेच दुषित पाण्यातून हा आजार पसरत असल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती

पुणे : ‘गुलियन बॅरे सिंड्रोम’ या आजाराच्या प्रादुर्भावाशी कुक्कुट पक्ष्यांचा संबंध असण्याची शक्यता पडताळून पाहण्याच्या केंद्र व राज्य सरकारच्या निर्देशानुसार खडकवासला धरण परिसरातील कुक्कुट पक्ष्यांचे क्लोॲकल स्वॅब नमुने, विष्ठा नमुने, पाण्याचे नमुने संकलित करुन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीमध्ये परिक्षणासाठी पाठविण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी दिली.

खडकवासला धरण परिसरात जीबीएस आजाराच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर या आजारास कारणीभूत घटकांमध्ये कुक्कुट पक्ष्याचा समावेश असल्याची तसेच दुषित पाण्यातून हा आजार पसरत असल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. त्यानुसार पशुसंवर्धन विभागाच्या पथकाने बाधित क्षेत्रालगत पाण्याचे मुख्य स्रोत असलेल्या खडकवासला धरण परिसरातील ११ कुक्कुट प्रक्षेत्रांना भेट दिली. या प्रक्षेत्रांमधून उत्सर्जित सांडपाणी नजीकच्या पाण्याच्या स्त्रोतात मिसळत नसल्याचे आढळून आले आहे. नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीकडून प्राप्त झालेल्या तपासणी अहवालानुसार एकूण नमुन्यांपैकी १०६ क्लोॲकल स्वॅब ८९ व कुक्कुट विष्ठा १७ तसेच नमुने (९ प्रक्षेत्रावरील २ कुक्कुट विष्ठा आणि २२ क्लॉॲकल स्वॅब नमुने) कंम्पायलोबॅक्टर जेजूनाय या जिवाणूसाठी सकारात्मक आलेले आहेत. एका प्रक्षेत्रावरील ५ नमुने नोरोव्हायरससाठी सकारात्मक आलेले आहेत. 

नॅशनल व्हायरॉलॉजी संस्थेने कुक्कुट प्रक्षेत्रावरील २९ पाणी नमुने तपासले असून त्यापैकी २६ पाणी नमुने कंम्पायलोबॅक्टर जेजूनाय अस्तित्व नकारात्मक आहे आणि उर्वरित ३ नमुने तपासणी सुरु आहे.कुक्कुट प्रक्षेत्र धारकांनी जैवसुरक्षा सुनिश्चित करावी. व्यक्तिगत स्वच्छता आणि प्रक्षेत्राचे नियमितपणे निर्जंतुकीकरण करावे. कोणतेही कुक्कुट पक्षी उत्सर्जने पाणवठ्यात जाणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना पशुसंवर्धन विभागाने दिल्या आहेत. हा आजार कुक्कुट पक्ष्यांपासून पसरत असल्याच्या चुकीच्या बातम्या येत आहेत. यामुळे कुक्कुट पालकांच्या व्यवसायावर विपरीत परिणाम झाला असून नागरिकांमध्ये देखील संभ्रम निर्माण होत आहे.

हा आजार संसर्गजन्य नसल्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. व्यवस्थित शिजवलेले चिकन खाल्ल्यास या जिवाणूचा संसर्ग होत नाही. त्यामुळे चिकन खाण्यास हरकत नाही. - डॉ. प्रवीणकुमार देवरे, पशुसंवर्धन आयुक्त

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडHealthआरोग्य