कुलकर्णी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे सुयश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:10 IST2021-08-01T04:10:58+5:302021-08-01T04:10:58+5:30

नारायणगाव : महाराष्ट्र प्रज्ञाशोध राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय परीक्षेत नारायणगाव येथील श्री अनंतराव कुलकर्णी इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन ...

Suyash of Kulkarni Vidyalaya students | कुलकर्णी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे सुयश

कुलकर्णी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे सुयश

नारायणगाव : महाराष्ट्र प्रज्ञाशोध राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय परीक्षेत नारायणगाव येथील श्री अनंतराव कुलकर्णी इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले असल्याची माहिती मुख्याध्यापिका अनघा जोशी यांनी दिली.

नौरोसजी वाडिया कॉलेज, पुणे यांच्या वतीने राज्यस्तरीय प्रज्ञा शोध परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत इंग्लिश मीडियम स्कूल शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध स्तरावर शिष्यवृत्ती मिळविली. या परीक्षेत एकूण ७० विद्यार्थी बसले होते परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला आहे. यशस्वी विद्यार्थी असे - आत्मजा आनंद सराईकर राज्यस्तरीय २७ वा क्रमांक, कौशल साहेबराव गाळव व तन्वी दिलीप काळे जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक व इतर २६ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळविले आहे . या विद्यार्थ्यांना व्ही डी औटी , वैशाली पुंडे, दीप्ती डेरे, वैशाली मोरे यांनी मार्गदर्शन केले . यशस्वी विद्यार्थ्यांचे ग्रामोन्नती मंडळाचे सर्व पदाधिकारी व संचालक मंडळांनी अभिनंदन केले आहे.

--

फोटो क्रमांक : ३१ नारायणगाव कुलकर्णी विद्यालय

फोटो - महाराष्ट्र प्रज्ञाशोध राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय परीक्षेत यश संपादन केलेले विद्यार्थी

Web Title: Suyash of Kulkarni Vidyalaya students