रस्त्याच्या वादातून एकाचा संशयास्पद मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:05 IST2020-12-02T04:05:51+5:302020-12-02T04:05:51+5:30

याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास भिवा कोळपे कासुर्डी येथील माळवाडी हद्दीतील देवराम ठोंबरे यांच्या ...

Suspicious death of one in a road dispute | रस्त्याच्या वादातून एकाचा संशयास्पद मृत्यू

रस्त्याच्या वादातून एकाचा संशयास्पद मृत्यू

याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास भिवा कोळपे कासुर्डी येथील माळवाडी हद्दीतील देवराम ठोंबरे यांच्या शेतात बकऱ्यांच्या तळाजवळ शेतात जात होते. त्यावेळी शेतात जाण्याच्या रस्त्याच्या कारणावरून सोमेश्वर ठोंबरे याने भिवा कोळपे यांना शिवीगाळ दमदाटी करून त्यांचे डोके मोटारसायकलवर तीन वेळा आपटले. दरम्यानच्या काळात त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी संदीप कोळपेने दिलेल्या फिर्यादीनुसार सोमेश्वर ठोंबरे याच्यावर खूनाचा गुन्हा नोंद करून अटक केली आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस , पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील , पोलीस उप निरीक्षक बाळासाहेब जगताप यांनी भेट दिली.

चौकट.............

खून नसल्याचा नातेवाईकांचा दावा........

सोमेश्वर ठोंबरेच्या नातेवाईकांनी भिवा कोळपे यांचा खून केला नसल्याचा दावा केला आहे. भिवा कोळपे यांच्या अंगावर कसल्याही मारहाणीच्या खूना नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल करू नये अशी मागणी केली. मात्र पोलिसांनी घडलेल्या प्रकारात फिर्यादीने दिलेल्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल केला असून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर खूना झाला आहे की नाही हे स्पष्ट होईल असे सागितले.

Web Title: Suspicious death of one in a road dispute