शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पूर्वकल्पना न देता ‘पीएमपी’ वाहतूक व्यवस्थापकाचे निलंबन; सेवा समाप्त करण्याचाही इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 18:29 IST

परवानगी न घेता गैरहजर असलेले निलंबित वाहतूक व्यवस्थापक सुनिल गवळी हे पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) सापडत नसल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्देसंचालक तुकाराम मुंढे यांनी पूर्वकल्पना न देता गैरहजर राहिल्याप्रकरणी गवळी यांना केले निलंबितगवळी यांना जाहीर सूचना प्रसिद्ध झाल्यापासून सात दिवसांच्या आत संपर्क साधण्याचे केले सूचित

पुणे : परवानगी न घेता गैरहजर असलेले निलंबित वाहतूक व्यवस्थापक सुनिल गवळी हे पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) सापडत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रशासनाने वृत्तपत्रांच्या माध्यमातून गवळी यांना कार्यालयात हजर राहण्याची सूचना केली आहे. अन्यथा सेवा समाप्त करण्याचा इशाराही या जाहीर सूचनेद्वारे देण्यात आला आहे.‘पीएमपी’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी कोणतीही पूर्वकल्पना न देता गैरहजर राहिल्याप्रकरणी गवळी यांना निलंबित केले आहे. दि. ६ डिसेंबरपासून कार्यालयाची परवानगी न घेता व कार्यालयास न कळविता कामावर गैरहजर असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. यासंदर्भात प्रशासनाने दि. ९ जानेवारी रोजी वृत्तपत्रांतून प्रसिद्ध केलेल्या जाहीर सूचनेनुसार, यापूर्वी गवळी यांनी कार्यालयाला दिलेल्या पत्त्यावर कारणे दाखवा नोटीस टपालाने पाठविण्यात आली होती. ही नोटीस पत्ता अपूर्ण म्हणून परत आली. त्यानंतर पुन्हा दि. १८ डिसेंबरला गवळी यांच्या विभागीय चौकशीसाठी जोडपत्रे टपालाने पाठविण्यात आली. हे टपालही अपूर्ण पत्ता म्हणून परत आले आहे. त्यानंतर कार्यालयीने सेवकामार्फत त्यांच्या घरी हा पत्रव्यवहार पाठविण्यात आला असता, घर बंद असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. कार्यालयाने उपलब्ध सर्व मार्गांचा प्रयत्न करूनही गवळी हे कार्यालयाशी संपर्क करीत नाही, अथवा कार्यालयाच्या प्रयत्नांना, पत्रव्यवहारांना प्रतिसाद देत नाहीत. त्यामुळे विभागीय चौकशीचे पुढील कामकाज करणे शक्य होत नाही. या जाहीर सूचनेद्वारे गवळी यांना जाहीर सूचना प्रसिद्ध झाल्यापासून सात दिवसांच्या आत संपर्क साधण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. अन्यथा सात दिवसांनंतर सर्व आरोप सिद्ध झाले असे गृहीत धरून सेवा समाप्त करण्यात येतील, असे जाहीर सूचनेद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, गवळी हे वैद्यकीय कारणास्तव कामावर रुजू होत नसल्याचे समजते. त्यांनी याबाबत प्रशासनाकडे दोन वैद्यकीय प्रमाणपत्रही सादर केली आहेत. तसेच ते दिलेल्या मुदतीत हजर होऊ शकतात, असेही सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :PMPMLपीएमपीएमएलtukaram mundheतुकाराम मुंढेPuneपुणे