शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सासवड ईव्हीएम चोरी प्रकरणातील तिन्ही अधिकाऱ्यांचे निलंबन रद्द, मॅटचे राज्य सरकारला आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2024 10:20 IST

पुरंदर तहसील कार्यालयातील स्ट्राँग रूममध्ये जनजागृतीसाठी ठेवलेल्या ईव्हीएम मशीनमधून एक कंट्रोल युनिट चोरीला गेल्याचा प्रकार फेब्रुवारीत घडला होता...

पुणे : सासवड येथील तहसीलदार कार्यालयात मतदानाच्या प्रचार व प्रसारासाठी देण्यात आलेल्या ईव्हीएम चोरी झाल्याप्रकरणी पुरंदर उपविभागीय अधिकाऱ्यांसह उपविभागीय पोलिस अधिकारी तसेच पुरंदरचे तहसीलदार या तिघांचे निलंबन रद्द करण्याचे आदेश महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरणाने (मॅट) राज्य सरकारला आदेश दिले आहेत. या तिघांनाही त्यांच्या मूळ ठिकाणी नियुक्ती देण्याचे आदेशात नमूद केले आहे.

पुरंदर तहसील कार्यालयातील स्ट्राँग रूममध्ये जनजागृतीसाठी ठेवलेल्या ईव्हीएम मशीनमधून एक कंट्रोल युनिट चोरीला गेल्याचा प्रकार फेब्रुवारीत घडला होता. या दिवशी रविवारी सुटीमुळे तहसील कार्यालय बंद होते. सोमवारी स्ट्राँग रूमचा दरवाजा उघडलेला दिसून आला. त्यावरून स्ट्राँग रूममधील प्रात्यक्षिक मशीनची चोरी झाल्याचे उघडकीस आले. त्यावेळी सहायक फौजदार डी. एल. माने आणि होमगार्ड राहुल जरांडे कर्तव्यावर होते. या घटनेनंतर त्यांना निलंबित करण्यात आले. त्यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतली.

आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत पुरंदरचे प्रांताधिकारी वर्षा लांडगे- खत्री, तहसीलदार विक्रम रजपूत तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बर्डे यांना निलंबित करण्याचे आदेश सरकारला दिले होते. याबाबत विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांची चौकशी समितीही स्थापन करण्यात आली होती. या आदेशाविरोधात लांडगे, बर्डे तसेच राजपूत यांनी मॅटमध्ये याचिका दाखल केली होती.

‘स्ट्राँग रूममध्ये झालेल्या चोरीप्रकरणी या तिघांचा कोणताही हलगर्जीपणा आढळून आला नाही. तसेच त्यांचा त्यात दोषही नाही. त्यामुळे आमची चूक नसताना आम्हाला निलंबन करणे योग्य नाही. त्यामुळे आमचे निलंबन रद्द करण्यात यावे,’ अशी विनंती याचिकाकर्त्यांच्यावतीने ॲड. पूनम महाजन यांनी केली होती. त्यावेळी राज्य सरकार तसेच निवडणूक आयोगाला उत्तर देता आले नाही. त्यामुळे महाजन यांच युक्तिवाद मान्य करून मॅटचे सदस्य न्या. व्ही. के. जाधव यांनी ग्राह्य धरून निलंबन रद्द करण्याचे सरकारला आदेश दिले. तसेच त्या तिघांची अनुक्रमे पुरंदरच्या प्रांताधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी तसेच तहसीलदारपदी नियुक्ती करण्याचे आदेशही त्यांनी सरकारला दिले आहेत. त्यामुळे या तिघांना दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :PuneपुणेEVM Machineएव्हीएम मशीनtheftचोरी