पोलीस उपनिरीक्षकासह कर्मचाऱ्याचे निलंबन

By Admin | Updated: February 24, 2016 03:33 IST2016-02-24T03:33:25+5:302016-02-24T03:33:25+5:30

वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकांकडून पैसे उकळणाऱ्या वाहतूक शाखेच्या पोलीस उपनिरीक्षकासह पोलीस हवालदारावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यांची खात्यांतर्गत चौकशी

Suspension of the employee with the police sub-inspector | पोलीस उपनिरीक्षकासह कर्मचाऱ्याचे निलंबन

पोलीस उपनिरीक्षकासह कर्मचाऱ्याचे निलंबन

पुणे : वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकांकडून पैसे उकळणाऱ्या वाहतूक शाखेच्या पोलीस उपनिरीक्षकासह पोलीस हवालदारावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यांची खात्यांतर्गत चौकशी केली जाणार असल्याची माहिती वाहुूतक शाखेचे उपायुक्त सारंग आवाड यांनी दिली.
खडकी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील सोनवणे व हवालदार पंडित आहिरे यांचे निलंबन करण्यात आले आहे. खडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर सोनवणे व आहिरे हे दोघे वाळू वाहतूक करणारे ट्रक आडवून त्यांच्या चालकांकडे पैसे मागत होते. याबाबत वाहतूक शाखेकडे तक्रार आली होती. या तक्रारीनुसार मंगळवारी दोघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. हे दोन कर्मचारी पैसे उकळत असल्याने वाहतुकदारांच्या संघटनेने आक्रमक भूमिका घेत वाहतूक शाखेकडे तक्रार केली होती.

Web Title: Suspension of the employee with the police sub-inspector