संचालकपद रद्द आदेशाला स्थगिती
By Admin | Updated: January 16, 2015 01:13 IST2015-01-16T01:13:14+5:302015-01-16T01:13:14+5:30
पवना सहकारी बँकेच्या आर्थिक दुर्बल घटकासाठी राखीव जागेवरील संचालक पदाची निवडणूक लढलेल्या जयनाथ काटे यांच्या निवडीबद्दल आक्षेप घेणारा दावा प्रतिस्पर्धी उमेदवार रमेश वाघेरे

संचालकपद रद्द आदेशाला स्थगिती
पिंपरी : पवना सहकारी बँकेच्या आर्थिक दुर्बल घटकासाठी राखीव जागेवरील संचालक पदाची निवडणूक लढलेल्या जयनाथ काटे यांच्या निवडीबद्दल आक्षेप घेणारा दावा प्रतिस्पर्धी उमेदवार रमेश वाघेरे यांनी पुणे येथील सहकार न्यायालयात दाखल केला होता. काटे यांनी जोडलेला उत्पन्न दाखला आणि त्यांचे प्रत्यक्ष उत्पन्न यातील विसंगती वाघेरे यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर या दाव्याच्या सुनावणीत न्यायालयाने काटे यांची निवड अवैध असल्याचा आदेश दिला. त्या निर्णयानंतर काटे यांनी मुंबईतील राज्य सहकारी वरिष्ठ स्तर न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने सुनावणीत या प्रकरणी स्थगिती आदेश दिला आहे. २७ जानेवारीला या दाव्याची अंतिम सुनावणी होणार आहे.
संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक २०१० मध्ये झाली होती. संचालक मंडळात आर्थिक दुर्बल गटासाठी राखीव जागेसाठी काटे आणि वाघेरे निवडणूक रिंगणात होते. काटे यांच्या उत्पन्नाच्या दाखल्याबाबत प्रतिस्पर्धी उमेदवार वाघेरे यांनी आक्षेप घेणारा दावा दाखल केला होता. वाघरे यांच्या अर्जावर पुणे येथील सहकार न्यायालयाने मागील आठवड्यात निकाल दिला. त्यामध्ये काटे यांनी निवड अवैध असल्याचे स्पष्ट करण्यात आले. या निर्णयाविरुद्ध वरिष्ठ स्तर सहकार न्यायालयात काटे यांनी धाव घेतली. त्या निर्णयास स्थगिती मिळाली आहे. (प्रतिनिधी)