शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

बडतर्फ विधी अधिकारी १० लाखांची लाच घेताना जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 10:55 PM

बडतर्फ असतानाही त्या पदावर असल्याचे भासवून मोकाच्या गुन्ह्यात तक्रारदाराच्या बाजूने अभिप्राय देण्यासाठी १० लाख रुपयांची लाच घेताना पुणे ग्रामीण कार्यालयातील बडतर्फ विधी अधिकारी व खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले.

पुणे : बडतर्फ असतानाही त्या पदावर असल्याचे भासवून मोकाच्या गुन्ह्यात तक्रारदाराच्या बाजूने अभिप्राय देण्यासाठी १० लाख रुपयांची लाच घेताना पुणे ग्रामीण कार्यालयातील बडतर्फ विधी अधिकारी व खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले. बडतर्फ विधी अधिकारी चंद्रकांत कांबळे व खासगी व्यक्ती शशिकांत जयप्रकाश राव (वय ५०, रा़ वडवण, मुंढवा) अशी त्यांची नावे आहेत. याबाबत माहिती अशी, तक्रारदार यांच्या मालकांविरुद्ध मोका कायद्यान्वये कारवाई करण्याचा प्रस्ताव प्राप्त झाला होता.या प्रस्तावावर विधी अधिकाऱ्यांचा अभिप्राय दिला जातो. चंद्रकांत कांबळे यांना या पदावरून मे २०१८ मध्ये बडतर्फ करण्यात आले होते. कांबळे याने अजून आपण त्याच पदावर असल्याचे तक्रारदाराला भासविले. त्यांंच्या मालकाच्या विरुद्ध मोका कायद्यान्वये प्राप्त प्रस्तावावर तक्रारदारांच्या बाजूने अभिप्राय देण्यासाठी १० लाख रुपयांची मागणी केली. तक्रारदारांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिल्यानंतर त्याची पडताळणी केली. कांबळे यांनी शशिकांत राव याच्याकडे पैसे देण्यास सांगितले. त्यानुसार पोलीस आयुक्तालयासमोरील चौपाटीवर तक्रारदारांकडून १० लाख रुपये स्वीकारताना राव याला पकडण्यात आले. त्यापाठोपाठ चंद्रकांत कांबळे यांना पकडण्यात आले. त्यांच्याविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संशयास्पद वागणुकीमुळेच केले होते बडतर्फचंद्रकांत कांबळे यांची ग्रामीण पोलीस दलातील मुख्यालयात कंत्राटावर विधी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली होती. त्यांच्याविरुद्ध तक्रार आली होती. त्याची चौकशी करुन व त्यांची वागणूक आणि व्यवहार संशयास्पद राहिल्याने मे २०१८ मध्ये त्यांना बडतर्फ करण्यात आले होते. अतिरिक्त पोलीस अधीक्षकांनी याबाबत चौकशी करून त्याचा अहवाल तयार केला. चंद्रकांत कांबळे यांना पुन्हा ग्रामीण पोलीस दलात विधी अधिकारी म्हणून नेमणूक करू नये, असा अहवाल गेल्या महिन्यात जानेवारी २०१९ मध्ये विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे पाठविला होता, असे पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले.