शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

वीज पुरवठा खंडीत राहिल्याने उपअभियंता निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 19:31 IST

वाघोली, बालेवाडी व पिंपळे सौदागरमधील काही सोसायट्यांमध्ये गेल्या काही दिवसांत वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले होते. तर काही सोसायट्यांमध्ये खंडित झालेल्या वीजपुरवठ्याचा कालावधी मोठा होता. या प्रकाराची महावितरणकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे.

ठळक मुद्देमहावितरणची कारवाई : चार अभियंत्यांना पाठविली कारणे दाखवा नोटीसखंडित झालेल्या वीजरपुरवठ्याच्या कालावधीवर नजर ठेवण्यासाठी प्रादेशिक कार्यालयात २४ नियंत्रण कक्ष सुरु

पुणे : पुणे व पिंपरी-चिंचवड  परिसरातील काही सोसायट्यांमध्ये अखंडीत वीज पुरवठा करण्यात होणारी दिरंगाई, खंडीत वीज पुरवठ्याचा कालावधी अधिक असणे अशा कारणामुळे एका उपकार्यकारी अभियंत्यावर मंहावितरणने निलंबनाची कारवाई केली आहे. चार अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. वाघोली, बालेवाडी व पिंपळे सौदागरमधील काही सोसायट्यांमध्ये गेल्या काही दिवसांत वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले होते. तर काही सोसायट्यांमध्ये खंडित झालेल्या वीजपुरवठ्याचा कालावधी मोठा होता. या प्रकाराची महावितरणकडून गंभीर दखल घेण्यात आली असून खंडीत झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्याची जबाबदारी असलेल्या वरिष्ठ अभियंत्यांकडून दिरंगाई झाल्याचे प्राथमिक चौकशीमध्ये दिसून आले. त्यामुळे वाघोली, बालेवाडी व पिंपळे सौदागरमधील वीजपुरवठा खंडित राहिल्याप्रकरणी एका उपकार्यकारी अभियंत्यास निलंबित करण्यात आले असून, ४ वरिष्ठ अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या शिवाय एका कार्यकारी अभियंत्यास सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे.विविध कारणांमुळे खंडित झालेला वीजपुरवठा तातडीने सुरळीत करण्यासाठी अभियंता व कर्मचाऱ्यांनी सतर्क व तत्पर राहावे अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा यापूर्वीच महावितरणकडून देण्यात आला होता. दीर्घकाळ वीजपुरवठा खंडित राहिल्याने वीजग्राहकांची गैरसोय होते, तसेच महावितरणचे मोठे आर्थिक नुकसान होते. मात्र, तीन ठिकाणी झालेल्या दिरंगाईमुळे महावितरणने वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात कारवाई सुरु केली आहे.पावसाळ्यात खंडित झालेल्या वीजरपुरवठ्याच्या कालावधीवर नजर ठेवण्यासाठी प्रादेशिक कार्यालयात २४ नियंत्रण कक्ष सुरु करण्यात आले आहे. अधीक्षक अभियंता (संचालन) यांच्या नियंत्रणात हा कक्ष कार्यरत आहे. जास्त प्रदीर्घ कालावधीसाठी खंडित राहिलेल्या वीजपुरवठ्यावर नियंत्रण कक्षाची नजर असून त्यासंबंधीचा अहवाल ताबडतोब वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात येतो.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडmahavitaranमहावितरणEmployeeकर्मचारी